Kitchen Tips In Marathi: दिवाळी झाली आता दिवाळीचा फराळ मात्र उरला आहे. त्याचबरोबर फराळ करण्यासाठी वापरण्यात आलेले तेलदेखील तसेच उरले आहे. गृहिणी तळणीसाठी वापरलेले तेल पुन्हा जेवणात वापरतात. मात्र, तळणीसाठी घेतलेले तेल पुन्हा वापरले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. आपण हे तेल फेकून सुद्धा देऊ शकत नाही. अशावेळी या तेलाचे काय करायचे याची माहिती आज आपण जाणून घेऊया.
दिवाळीत चकल्या, करंज्या किंवा चिरोटे तळण्यासाठी जास्त तेलाचा वापर केला जातो. मात्र, सतत वापरुन हे तेल थोडे काळ पडते. काही गृहिणी या तेलाचा पुन्हा तळणीसाठी वापर करतात. मात्र, हे तेल अतिप्रमाणात गरम झाल्याने यात एक्रोलीन, एक्रेलामाइड आणि पॉलिसाइक्लिम एरोमेटिक हायड्रोकार्बन तयार होतात. त्यामुळं तेलात अनेक विषारी तत्वे निर्माण होतात. असे तेल पुन्हा तळण्यासाठी वापरले तर कँन्सर किंवा हृदयरोगासंबंधित आजार वाढू शकतात. लिव्हर, किडणी आणि फुफ्फुसांचे आजार वाढीस लागतात.
उरलेल्या तेलाचा वापर तुम्ही पुन्हा चपात्यांसाठी करु शकता. चपात्या भाजताना हे तेल तुम्ही लावू शकता.
दिव्यात वापर करा
आजही घराबाहेर तुळशीजवळ किंवा दाराजवळ दिवा लावला जातो. त्यामुळं तुम्ही हे तेल दिव्यात टाकू शकता. त्याव्यतिरिक्त डेकोरेशनसाठी असलेल्या दिव्यातही तेल तुम्ही टाकू शकता.
फर्निचरची स्वच्छता
फर्निचरची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही तळलेल्या तेलाचा पुर्नवापर करु शकता.तुम्ही हे तेल फर्निचर पॉलिश करण्यासाठी वापरु शकता. तेलात व्हाइट व्हिनेगर मिसळून स्वच्छता करण्यासाठी तुम्ही याचा वापर करु शकता.
वापरेलेल तेल तुम्ही बेकिंगसाठी पुन्हा वापरु शकता. काही तिखट किंवा गोड बनवायचे असेल तर हे तेल तुम्ही वापरु शकता.
अनेकदा कुकिंग ऑइल काळपट दिसते. अशावेळी गृहिणी ते फेकून देतात. काही जणी किचन सिंकमध्ये तेल फेकून देतात. अशावेळी तेल आणि तेलात असलेले कण हे किचनच्या ड्रेनेज पाईपला चिटकून बसतात. तेल चिकट असल्याने ते ड्रेनेज पाईप तुंबण्याची शक्यता असते. अशावेळी तो ड्रेनेज पाईप साफ करणे खूप कठिण होऊन बसते
उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताना या गोष्टी लक्षात घ्या
उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करताना आधी ते पूर्णपणे थंड करुन घ्या. त्यानंतर तेल गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. जेणेकरुन तेलात उरलेले काळ्या रंगाचे कण निघून जातील. हे तेल आता हलके गरम करुन साफ कंटेनरमध्ये भरुन घ्या. त्यानंतरच ते वापरायला काढा.