'त्याच्यासोबत लग्न करू नको तो दोन मुलांचा बाप आहे..' लग्नाआधी बेबोला करावा लागला अनेक गोष्टींचा सामना

अनेक अभिनेत्रींनी घटस्फोट झालेल्या पुरूषांसोबत लग्न केलं आहे.

Updated: Apr 25, 2021, 08:42 AM IST
'त्याच्यासोबत लग्न करू नको तो दोन मुलांचा बाप आहे..' लग्नाआधी बेबोला करावा लागला अनेक गोष्टींचा सामना  title=

मुंबई : अद्यापही घटस्फोट झालेल्या पुरूषाकडे आणि महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन आताच्या काळातही वेगळा आहे. घटस्फोट झालेल्या पुरूषासोबत किंवा महिलेसोबत लग्न करायचं नाही असे अनेकांचे विचार असतात. पण घटस्फोट झालेल्या लोकांना देखील त्यांचं आयुष्य नव्याने सुरूवात करण्याचा अधिकार आहे. पती-पत्नी यांच्यात वाद असतील, ते एकमेकांसोबत आनंदी नसतील तर शेवटचा पर्याय कायमचं विभक्त होत आयुष्यात पुढे जाणं हाचं एक मार्ग असतो. 

कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी घटस्फोट झालेल्या पुरूषासोबत लग्न केलं आहे आणि आज त्यांचा संसार अगदी उत्तम सुरू आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची बेबो अर्थातचं अभिनेत्री करीना कपूर खान. अभिनेता सैफ अली खानचं करीनासोबत दुसरं लग्न आहे. त्याला पहिल्या लग्नापासून दोन मुलं देखील आहेत. 

दरम्यान, 'कॅफी विद करण'च्या शोमध्ये करीनाने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल खुलासा केला. बेबो म्हणाली, 'मला अनेकांन सांगितलं की सैफचं घटस्फोट झालं आहे. त्याला दोन मुलं देखील आहेत. त्याच्यासोबत लग्न करून तू आनंदी राहशली का? सैफसोबतचं लग्न करायचं आहे, या तुझ्या निर्णयावर तू ठाम आहेस का?'

पुढे करीना म्हणाली, 'सैफसोबत लग्न झाल्यानंतर तुझं करियर संपेल. तो कधीचं चांगला पती होवू शकतं नाही. लोकांच्या या सगळ्या गोष्टी ऐकून मला असं वाटायचं की घटस्फोट झालेल्या व्यक्तीवर प्रेम करणं यात काही गुन्हा आहे का?...' करीना कपूर ही पहिली अभिनेत्री नाही जिने घटस्पोट झालेल्या पुरूषासोबत लग्न केलं आहे.