मुंबई : बॉलीवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि बॉलीवूडचा अभिनेता धर्मेंद्र यांच्या लग्नाच्या वाढदिवसाप्रसंगी आज त्यांची मुलगी ईशा देओलने फोटो शेअर केले आहेत. धमेंद्रला हेमा मालिनीला मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. धमेंद्र आणि हेमा मालिनीचं प्रेम बॉलीवूडमध्ये खूप चर्चेत राहिलं आणि वादातही. हेमा मालिनी आणि धमेंद्रच्या लग्नाच्या वाढदिवस प्रसंगी ईशा देओलने तिच्या इन्स्टावर आईबाबांचा एक फोटोंचा कोलाज शेअर केला आहे, आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईशाने फोटो शेअर करून लिहिलं, तुम्ही माझ्या जीवनातील अमुल्य व्यक्ती आहात, आणि तुमच्याशिवाय मी काहीच नाही, असा भावनिक मेसेज लिहून ईशाने फोटो शेअर केला आहे.
हेमा मालिनी आणि धमेंद्र यांच्या लग्नाच्या वाढदिवसावर बोलताना, त्यांची प्रेमकहाणी काय होती हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे, कारण धमेंद्रचं लग्न होवूनही धमेंद्र हेमा मालिनीच्या खूप प्रेमात होता.
धमेंद्रने सिनेसृष्टीत पाय ठेवण्याआधी त्याचं लग्न प्रकाश कौर सोबत झालं होतं, पण चित्रपट सृष्टीत आल्यानंतर त्याला हेमा मालिनीसोबत प्रेम झालं. मैत्रीनंतर त्यांचं प्रेम फुलत गेलं, धमेंद्र आणि हेमा मालिनीने अनेक चित्रपट सोबत केले. शोले चित्रपटात तर दोन्ही जणांचं प्रेम खूप पुढे गेलं होतं, म्हणजे स्टेशन से गाडी जब छुट जाती है तो, एक दो तीन हो जाती है, असं गाडीसारखं हे प्रेम पुढे गेलं होतं.
पण म्हणतात ना, प्रत्येक प्रेमाची एक कहाणी असते, हेमा मालिनी दक्षिण भारतीय कुटुंबातून होती, हेमा मालिनीच्या आईवडिलांना धमेंद्रसोबतचं हे हेमाचं प्रेम अजिबात आवडत नव्हतं.धमेंद्र पंजाबी कुटूंबातून आणि आधीच लग्न झालेले होते, तेव्हा हेमा मालिनीच्या घरच्यांना हे पसंद नव्हतं. एवढंच नाही चित्रपटादरम्यानच्या शुटिंगवर देखील त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत होती.
यानंतर मात्र धमेंद्रने आपल्या पहिल्या बायकोकडून घटस्फोट मागितला, पण तिने घटस्फोट देण्यास इन्कार केला. इस्लाम धर्माशिवाय इतर कोणत्याही धर्मात बायकोची परवानगी म्हणजेच घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही, म्हणून धमेंद्रने इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनीसोबत लग्न केलं.