Jalna Lathi Charge: सध्या चर्चा आहे ती म्हणजे जालन्यातील लाठीलार्जची. त्यामुळे सर्वत्र राजकीय वातावरण पेटलं आहे. यावेळी मराठी कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. काल 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महागडे हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं या प्रकरणावरून तीव्र निषेध व्यक्त केला होता. आता तिच्यानंतर एका मोठ्या मराठी अभिनेत्यानं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यातून त्यानंही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनंही यावर आपली प्रतिक्रिया उमटवली आहे.
दोन दिवसांपुर्वी जालना येथे शांत मार्गानं सुरू असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याचे पडसाद हे संपुर्ण महाराष्ट्र भरता उमटू लागले होते. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. यावर विरोधी पक्षनेत्यांनीही तीव्र विरोध केला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली होती. त्याचसोबत उदयनराजे भोसलेहा आंदोलकांच्या भेटीला आले होते.
आज राज्य सरकारनं यावेळी या पोलिसांवर कारवाई केली आहे. पोलिस अधिक्षकांना यावेळी राज्य सरकारनं सक्तीची रजा दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भाषणातून आज याची पुष्टी केली होती. अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेही यावेळी एक पोस्ट शेअर केली आहे. ट्विटरवरून तो म्हणाला की, ''जालन्यात शांततापूर्ण मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर क्रूर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध! दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला हवी! आपल्या महाराष्ट्रात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी…राजकारणासाठी हे सारं चिघळता कामा नये!'', असं तो यावेळी पोस्टमध्ये म्हणाला आहे. अश्विनी महागडे हिनं 'मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज…का? कशासाठी?' असं लिहित आपली एक इन्टाग्राम स्टोरी व्हायरल केली होती.
हेही वाचा : उंच, गोरा गोमटा आणि पाणीदार डोळे! हृतिक रोशनचा मुलगा किती मोठा झाला पाहा...
जालन्यात शांततापूर्ण मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर क्रूर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा तिव्र निषेध! दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला हवी! आपल्या महाराष्ट्रात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी… राजकारणासाठी हे सारं चिघळता कामा नये!
— Hemant Dhome हेमंत ढोमे (@hemantdhome21) September 3, 2023
हेमंत ढोमे हा अनेकदा सामाजिक-राजकीय घटनांवर व्यक्त होतो. जूलै महिन्यात अजित पवार गटाच्या बंडावरूनही त्यानं सोशल मीडियावर आपलं मतं मांडले होते. यावेळी या घटनेनं महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला जातो आहे. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासोबत 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. उपोषणकर्त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी प्रशासनानंही प्रयत्न सुरू केले होते. दोन वेळा झालेल्या चर्चेतूनही काही साध्य झालं नाही. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.