दिलीप कुमार यांच्या फोटोमागील व्हायरल सत्य

स्वतः दिलीप कुमारांनी केला खुलासा 

Updated: Dec 18, 2019, 03:47 PM IST
दिलीप कुमार यांच्या फोटोमागील व्हायरल सत्य  title=

मुंबई : 11 डिसेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी आपला 97 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डतर्फे दिलीप कुमार यांचा सन्मान करण्यात आला. मात्र तब्बेतीच्या कारणामुळे दिलीप कुमार त्या कार्यक्रमाला पोहोचू शकले नाहीत. सोशल मीडियावर या पुरस्कारासोबत दिलीप कुमारांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. 

दिलीप कुमार आपल्या तब्बेतीच्या अस्वास्थामुळे या पुरस्कार सोहळ्याला जाऊ शकले नाही. त्यावेळी त्यांची पत्नी सायरा बानो, भाई असलम खान आणि बहिण फरीदा खाव हा पुरस्कार सोहळ्यासाठी गेले होते. सोशल मीडियावर त्यांचा फोटो व्हायरल होत आहे. 

व्हायरल झालेल्या फोटोवर अनेकांनी प्रश्न विचारला की, दिलीप कुमार वयानुसार इतके बदलले? या संदर्भात ट्वीट देखील करून चाहत्यांनी प्रश्न विचारले. यावर दिलीप कुमारांच्या अकाऊंटवरून उत्तर देण्यात आलं आहे. 

या ट्विटरवरून उत्तर देण्यात आलं आहे. 'व्हायरल झालेल्या फोटोत जी व्यक्ती दिसत आहेत. ते दिलीप कुमारनसून त्यांचे भाऊ असलम खान आहेत.' वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर दिलीप कुमार यांना 1994 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. 2015 रोजी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.