रानू मंडलच्या ट्रोलिंगविषयी काय बोलला हिमेश रेशमिया?

रानू मंडलला बॉलिवूडमध्ये हिमेश रेशमियाकडून संधी 

Updated: Dec 10, 2019, 12:05 PM IST
रानू मंडलच्या ट्रोलिंगविषयी काय बोलला हिमेश रेशमिया?

मुंबई : कोलकाता रेल्वे स्टेशनवर गाण गाणारी रानू मंडल एका व्हिडिओमुळे जगभरात ओळखली गेली. तिच्या आवाजाने नेटीझन्ससोबतच दिग्दर्शक आणि गायक हिमेश रेशमियाला देखील भुरळ पडली. त्यानंतर हिमेश रेशमियाने रानू मंडलकडून त्याच्या सिनेमात गाणं गाऊन घेतलं. 

यानंतर रानू मंडलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये रानू मंडलचा उद्धटपणा देखील तिच्या चाहत्यांना दिसला. यावर हिमेश रेशमिया याला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हिमेश रेशमिया यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय आहे. (हिमेशनंतर 'या' गायकासोबत गाणार रानू मंडल)

इतर कम्पोझर्सला देखील त्यांनी विनंती केली आहे की, रानू मंडलचा आवाज चांगला आहे. तिचा आवाज वेगळा आहे. त्यामुळे तिच्याकडून गाणी गाऊन घ्या. तसेच पत्रकारांनी पुढे हिमेश रेशमियाला रानू मंडलच्या ट्रोलबाबत प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिलं की,'मला तुम्ही हा प्रश्न का विचारताय? मी त्यांचा काही मॅनेजर नाही.'

आदत नावाच्या गाण्यात त्यांनी गायलं आहे. ते गाणं छान गायलं आहे. तसेच 'लुटेरी' गाण्यात कार्तिकला ब्रेक दिला आहे. दर्शनला "खिच मेरी फोटो' हे गाणं गायलं आहे. पलकला "प्रेम रतन' या गाण्यात गाण्याची संधी दिली. मला असं वाटतं की, माझ्या गाण्याकरता ज्याचा आवाज चांगला वाटेल त्या व्यक्तीला मी संधी देतो, असं देखील यावेळी हिमेश रेशमिया म्हणाला. 

हिमेश रेशमिया यांनी रानू मंडलला गाण्याची संधी दिल्या नंतर ती भरपूर चर्चेत आली. एवढंच नव्हे तर त्यानंतर रानू मंडलचा ऍटिट्यूड बदलला असल्याची देखील चर्चा झाली. रानू मंडलसोबत सेल्फी काढणाऱ्या एका महिलेला रानू मंडलने ज्या प्रकारे वागणूक दिली ही वागणूक कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर रानू मंडल सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.