मुंबई : दारू एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे अनेक घरं उध्वस्त झाली. पण एका प्रसिद्ध गायकाने, रॅपरने त्याचं दारूच्या बाटलीला प्रेरणा स्थानी ठेवलं आणि प्रेक्षकांना त्या वर्षाचं नंबर एकचं गाणं दिली. त्या गाण्यावर तरूणाई तर थिरकली, पण लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना त्या गाण्याने भूरळ घातली. ते गाणं आणि गायक म्हणजे यो यो हनी सिंग... हनी सिंगच्या त्या प्रसिद्ध गाण्याचं नाव आहे 'चार बॉटल वोडका....'
आपल्या गण्याच्या तालावर संपूर्ण जगाला ताल धरायला लावणारा रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग बरेच दिवस पडद्यापासून लांब होता. काही दिवसांपूर्वी त्याने 'मखना' या गाण्यातून कमबॅक केले. त्यानंतर घरगुती वादामुळे चर्चेत आलेल्या हनीचा आज वाढदिवस आहे.
त्यामुळे हनीच्या प्रसिद्ध गाण्याबद्दल जाणून घेवू. एक काळ असा होता जेव्हा तरूणाईच्या दिवसाची सुरूवात 'चार बॉटल वोडका....' गाण्याने होत असे. पण या गाण्याची कल्पना हनीला भंगारवाल्याचं रोजचं काम पाहून आली.
'द कपिल शर्मा' शोमध्ये हनीने गाण्याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, 'माझ्या घराच्या खिडकीतून एका भंगारवाल्याचं दुकान दिसतं. त्या भंगारवाल्याकडे रोज दारूच्या बाटल्या असायच्या त्यामुळे मला 'चार बॉटल वोडका....' गाण्याची कल्पना आली...'
'चार बॉटल वोडका....' गाणं तुफान गाजलं. कोणताही कार्यक्रम 'चार बॉटल वोडका....' गाण्याशिवाय पूर्ण होवू शकत नाही. आज या गाण्याला अनेक वर्ष झाली असील तरी गाण्यची क्रेझ अद्यापही आहे.