पुरुषांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्यावर कायद्याचा बडगा

 2005 पासून 2008 दरम्यान आणि 2013 मध्ये या घटना घडल्या होत्या

Updated: May 27, 2022, 12:42 PM IST
पुरुषांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्यावर कायद्याचा बडगा title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : संपूर्ण कलाजगताला हादरा देणारी बातमी समोर आली आणि विकृत मानसिकतेला कायद्यानं कसं चिरडून टाकलं हेसुद्धा पाहायला मिळालं. एका लोकप्रिय अभिनेत्यावरील पुरुषांवर लैंगिक अत्याचार करण्याचे आरोप अखेर सिद्ध झाले आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार 2005 पासून 2008 दरम्यान लंडन आणि 2013 मध्ये ग्लूस्टरशायर इथं या घटना घडल्या होत्या. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी पुरावे गोळा केल्यानंतरच त्यांची पडताळणी होताच अभिनेत्यावरील गुन्हे सिद्ध झाले. 

हा अभिनेता म्हणजे केविन स्पेसी (Kevin Spacey). आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत 2 वेळा ऑस्कर पुरस्कार मिळवणारा हॉलिवूड अभिनेता केविन याला 2017 पासून लैंगिक अत्याचारांच्या आरोपांना सामोरं जावं लागत आहे. (hollywood actor kevin spacey charged with sexual assault read details)

Oscar-winning actor Kevin Spacey charged with sexual assault in UK

CPS स्पेशल क्राइम डिवीजननं म्हटल्यानुसार तीन पुरुषांनी केविनवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. 2017 मध्ये त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. जिथं, त्यानं 1986 मध्ये एका अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचं म्हटलं गेलं. याशिवाय 'हाउस ऑफ कार्ड्स' मधील क्र्यू मेंबरससोबतही असंच घडलं होतं. 

2021 ला केविनला कंपनीच्या सेक्शुअल हॅरॅसमेंट धोरणाची पायमल्ली करण्यासाठी स्टुडिओला जवळपास 31 मिलियन डॉलर इतक्या रमकेची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. केविननं मात्र हे सर्व आरोप फेटाळले होते.