रहस्यमय कथेवर आधारलेल्या 'घोस्ट'चा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी आणखी एक हॉरर चित्रपट चाहत्यांच्या भेटीस आणला आहे. 

Updated: Sep 23, 2019, 05:54 PM IST
रहस्यमय कथेवर आधारलेल्या 'घोस्ट'चा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : 'राज', '१९२०', 'हॉन्टेड 3D' यांसारख्या हॉरर चित्रपटांचे दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी आणखी एक हॉरर चित्रपट चाहत्यांच्या भेटीस आणला आहे. 'घोस्ट' असं नाव असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. 'कानुन सिर्फ इंसानो पर लागू होता है. भूत-प्रेत आत्माओपर नही...' चित्रपटामध्ये टीव्ही अभिनेत्री सनाया ईरानी आणि अभिनेता शिवम भार्गव मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. 'घोस्ट' १८ ऑक्टोबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 

चित्रपटात शिवम 'करण' नावाची एक व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. करणची पत्नी बरखाची हत्या झाली आहे. करणला या सर्व प्रकरणातून बाहेर काढण्याची जबाबदारी सनायाने आपल्या खांद्यावर घेतल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. सनाया चित्रपटात वकिलाची भूमिका बजावताना दिसणार आहे. 

याचदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. सनायासाठी हा चित्रपट फार महत्वाचा आहे. याआधी तिने 'फना', 'पीहू' चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्याचप्रमाणे तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील उत्तम अभिनय केला आहे.