असा नवरा हवा गं बाई; अभिनेत्रीने 'अहों'च्या शोधात लिहिली पोस्ट

पाहा पोस्टनुसार तिच्या अपेक्षा आहेत तरी काय 

Updated: Sep 23, 2019, 06:20 PM IST
असा नवरा हवा गं बाई; अभिनेत्रीने 'अहों'च्या शोधात लिहिली पोस्ट title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : सेलिब्रिटींनी आजवर सोशल मीडियाच्या वापर फोटो पोस्ट करण्यासाठी, त्यांच्या आगामी चित्रपट, मालिकां किंवा कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी आणि अनेक काही कारणांसाठी केला. पण, सध्याच्या घडीला एक अभिनेत्री तिच्या जोडीदाराच शोध या सोशल मीडियाच्या माध्यमातून घेत आहे. वधुरुपातील सुरेख आणि लक्षवेधी फोटो पोस्ट करत तिने आपल्याला नेमका मुलगा हवा तरी कसा, याविषयीच्या अपेक्षा लिहिल्या आहेत. 

इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून नवरा मुलगा शोधण्याविषयी पोस्ट करणारी ही अभिनेत्री आहे, अदा शर्मा. लाल रंगाचा लेहंगा, हिरव्या रंगाची चोळी आणि त्याला जोड देणाऱ्या लाल रंगाच्या जाळीदार ओढणीच्या साथीने अदाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एखाद्या वधुप्रमाणेच दिसत आहे. 

नववधुचा साज घेतलेल्या या अभिनेत्रीने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'नवरा मुलगा पाहिजे ...- जो कांदा खात नसेल. जात, धर्म, पंथ, वर्ण, पायाचं माप, दंड किती मोठे आहेत, पोहण्याची येतं का, इन्स्टाग्रामचे फॉलोअर्स, राशीभविष्य या साऱ्याची काहीच गरज नाही....'

इतक्यावरच न थांबता अदाने तिच्या खऱ्या अपेक्षांची यादी पुढे लिहिली आहे. ज्यामध्ये ती नमूद करते, 'दिवसातून तीन वेळा आनंदाने जेवण बनवता आलं पाहिजे. नियमित दाढी करावी. घराज जीन्स वापरली तरी चालेल. पण, बाहेर मात्र पारंपरिक भारतीय पेहराव वापरावा. दिवसाला त्याला पाच लीटर पाणी पिण्यासाठी देण्यात येईल. पण, मद्य किंवा कोणत्याही प्रकारच्या प्राण्याचं सेवन घरात आणि घराबाहेरच्या परिसरातही निर्बंधीत. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्व भाषांचा आदर करावा आणि त्यांचा आनंद घ्यावा.....' 

ही भली मोठी अपेक्षांची जादी वाचल्यांतर खाली एक तारीखही दिसते.... पाच वर्षांपूर्वची. आता अदाची ही अदा नेमकी कशासाठी आहे, असा प्रश्न पडत असेल तर पोस्ट सुरुवातीलाच वाचा. अदाची ही अदा, अनेकांवर प्रश्नांचा भडीमार करत आहे, ज्याचं स्पष्ट उत्तर ती स्वत:च देऊ शकेल. तूर्तास, सोशल मीडियावर या आगळ्या वेगळ्या शोधमोहिमेची चर्चा मात्र होत आहे हे खरं.