Disha Pataniच्या गुलाबी बिकिनीतला हॉट फोटो, टायगरच्या कमेंटने वेधलं लक्ष

पाहा फोटो  

Updated: Jan 9, 2022, 04:50 PM IST
Disha Pataniच्या गुलाबी बिकिनीतला हॉट फोटो, टायगरच्या कमेंटने वेधलं लक्ष title=

मुंबई : अभिनेत्री दिशा पटानी सध्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. नॅशनल क्रश असणारी दिशा कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता दिशाने गुलाबी बिकिनीमध्ये स्वतःचा एक हॉट फोटो शेअर केला आहे. सध्या तिचा हॉट फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

दिशाच्या फोटो अनेकांच्या लाईक्स आणि कमेंट येत आहेत. अशात अभिनेता टायगर श्रॉफ का बरं मागे राहिल. टायगरने कमेंटमध्ये दिशाच्या बिकिनी फोटोवर फायर इमोजी पाठवला आहे. 

टायगरच्या कमेंटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. टायगर आणि दिशा रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कबुली दिली नाही. दोघांना अनेकदा सुट्ट्यांचा आनंद घेताना स्पॉट करण्यात आलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A

एवढंच नाही तर दोघे कार्यक्रमांमध्ये किंवा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. दिशाच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर ती 'योद्धा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

'योद्धा' चित्रपटाशिवाय दिशा 'एक व्हिलन 2' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.