चर्चा तर होणारच... बॉलीवूडच्या या अभिनेत्रीने दिले सगळ्यात जास्त बोल्ड सीन

फिल्मी दुनियेशिवाय अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते.

Updated: Jan 9, 2022, 04:24 PM IST
चर्चा तर होणारच... बॉलीवूडच्या या अभिनेत्रीने दिले सगळ्यात जास्त बोल्ड सीन title=

मुंबई : 'पॅडमॅन' फेम अभिनेत्री राधिका आपटे नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असते. राधिका आपटे अशीच एक अभिनेत्री आहे जी बोल्ड सीन द्यायला मागेपुढे पाहत नाही. या अभिनेत्रीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लाखो मने जिंकली आहेत.

'मांझी' असो किंवा 'पॅडमॅन' या अभिनेत्रीने प्रत्येक चित्रपटात आपलं दमदार अभिनय कौशल्य दाखवलं आहे. फिल्मी दुनियेशिवाय राधिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. MMS लीक होण्यापासून ते संमतीशिवाय लग्न करण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीमुळे राधिका कहेडलाईनमध्ये राहिली आहे. आज आम्ही तुम्हाला या रिपोर्टमध्ये राधिकाच्या त्या चित्रपटांची ओळख करून देणार आहोत, ज्यामध्ये तिने खूप बोल्ड सीन्स दिले आहेत.

राधिका आपटेने 2018 साली 'द वेडिंग गेस्ट' या चित्रपटात देव पटेलसोबत खूप बोल्ड सीन्स दिले होते. या चित्रपटातील अनेक सीनने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. 2015 मध्ये अभिनेत्रीचा बदलापूर या चित्रपटातील बिकिनी फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून चाहते थक्क झाले होते.

राधिका आपटेने २०१६ मध्ये आलेल्या 'पार्च्ड' चित्रपटात आदिल हुसैनसोबत इंटिमेट सीन दिले होते. या सीनने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. पार्च्ड या चित्रपटात राधिका आपटेने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी तिने एक न्यूड सीन शूट केला. जो लीक झाला आणि पाहताच व्हायरल झाला. यामुळे राधिकालाही जबरदस्त ट्रोलिंगला बळी पडावं लागलं होतं. बॉलीवूडच्या या अभिनेत्रीने सगळ्यात जास्त बोल्ड सीन  दिले आहेत.

राधिका आपटेने 2005 मध्ये 'वाह' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'लाइफ हो तो ऐसी'मध्ये छोट्या भूमिकेतून तिने करिअरला सुरुवात केली. त्याचबरोबर अभिनेत्री आतापर्यंत अनेक मोठे चित्रपट, लघुपट आणि वेब सीरिजमध्ये दिसली आहे.