बॉक्स ऑफिसवर 'हाऊसफुल ४'ची डबल सेन्चुरी

'हाऊसफुल ४'च्या कमाईचे आकडे पोहचले...

Updated: Nov 17, 2019, 01:58 PM IST
बॉक्स ऑफिसवर 'हाऊसफुल ४'ची डबल सेन्चुरी
फिल्म पोस्टर

मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ४' २५ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 'हाऊसफुल ४' प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. 'हाऊसफुल ४'च्या कमाईच्या आकड्यांनी डबल सेन्चुरी केल्याची माहिती मिळत आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित मल्टीस्टारर 'हाऊसफुल ४' मध्ये अक्षय कुमारव्यतिरिक्त क्रिती सेनन, रितेश देशमुख, कृती खरबंदा, बॉबी देओल आणि पूजा हेगडे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'हाऊसफुल ४'ने तीन आठवड्यात जवळपास २००.१८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

पहिला आठवडा - १३५.८६ कोटी
दुसरा आठवडा - ४८.७ कोटी
तिसरा आठवडा - १६.२५ कोटी
एकूण - २००.१८ कोटी

BOX OFFICE पर 'हाउसफुल 4' ने पहले दिन ही बटोरे इतने करोड़, बनाया नया रिकॉर्ड

दरम्यान, सोशल मीडियावर 'हाऊसफुल ४'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन चुकीचं असल्याचं बोललं जात आहे. निर्मात्यांवर 'हाऊसफुल ४'चे आकडे चुकीचे सांगितले जात असल्याचा आरोप केला जातोय. 

अभी भी करोड़ों में खेल रही है 'हाउसफुल 4', BOX OFFICE पर अब तक हुई इतनी कमाई

  

यावर अक्षय कुमारने प्रतिक्रिया देत, जे यश मिळवलं आहे त्यासाठीचा मार्ग छोटा नाही. सर्व काही अनुभवातून शिकण्यात आलं आहे. त्यामुळे यश दाखवण्यासाठी, चुकीचे आकडे समोर आणणं शक्य नसल्याचं त्याने म्हटलं आहे.