हृतिक रोशनची बहीण आहे खूपच स्टायलिश; फोटो पाहून चाहते घायाळ

हृतिक रोशन अत्यंत डॅशिंग आहे आणि तो त्याच्या लूक आणि स्टाईलवर चाहते नेहमी फिदा होतात.

Updated: Jul 10, 2022, 11:12 PM IST
हृतिक रोशनची बहीण आहे खूपच स्टायलिश; फोटो पाहून चाहते घायाळ title=

मुंबई : हृतिक रोशन अत्यंत डॅशिंग आहे आणि तो त्याच्या लूक आणि स्टाईलवर चाहते नेहमी फिदा होतात. यामुळेच त्याला ग्रीक देव असंही म्हणतात. त्याने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचे वडील राकेश रोशन हे देखील त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेते होते. आता त्याच्या कुटुंबातील हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन हिलाही चित्रपटांमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. लूकमध्ये ती तिच्या भावावर गेली आहे. तिच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये मोठ्या प्रमाणात भाऊ हृतिक रोशन सारखी आहेत.

ती तिच्या भावाप्रमाणे दिसायलाही खूप सुंदर आहे. ती चित्रपट निर्माते राजेश रोशन यांची मुलगी आणि हृतिक रोशनची चुलत बहीण आहे. राजेश रोशन हे अभिनेते राकेश रोशन यांचे भाऊ आहेत. खरंतर, चेहऱ्याची वैशिष्ट्ये किंवा दिसणं कधी-कधी अनुवांशिक असतात जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात.

यामुळेच कुटुंबातील अनेक सदस्य एक सारखे दिसतात. हेच कारण आहे की पश्मिना लूकच्या बाबतीत तिच्या कुटुंबावर गेली आहे आणि ती लूकबाबत तिच्या भाऊ आणि वडिलांवर गेली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पश्मिना रोशन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पश्मिना रोशन तिचा भाऊ हृतिक रोशनच्या खूप जवळ आहे. बर्‍याच फोटोंमध्ये भाऊ-बहीण एकत्र मस्ती करताना दिसतात. वृत्तानुसार, पश्मिना रोशनने अभिनयात करिअर करण्यासाठी नदीरा बब्बर यांच्याकडून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि बॅरी जॉन इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षणही घेतलं आहे. तिने काही इंग्रजी नाटकंही केली आहेत.