साडीत व्यायाम करणार्‍या 'या' अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल ...

...

Updated: Jun 6, 2018, 01:13 PM IST
साडीत व्यायाम करणार्‍या 'या' अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल ...  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा अदा शर्मा व्हिडिओ, फोटो शेअर करण्यासाठी इंस्टाग्राम अकाऊंटची मदत घेते. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या फीटनेस चॅलेन्जमध्ये सहभागी होत अदा शर्माने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. 

साडी नेसून व्यायाम 

अदा शर्माने साडी नेसून व्यायाम करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. बाल्कनीमध्ये  अदा व्यायाम करत आहे. फीटनेस चॅलेन्जमध्ये पूर्ण पारंपारिक अंदाजामध्ये सहभागी होत आहे असा खास मेसेज अदा शर्माने लिहला आहे. सोबतच कुणीही या साडीचा लूक कॉपी करू नये असे लिहले आहे. कारण अदा शर्मा या लूकचेही पेटंट मिळवणार आहे.  

 

 

Since this is a Fit INDIA challenge , I'm going all INDIAN. (I'm patenting the wearing saree and working out look.... Other actresses pls don't copy SAREE workouts ) . . One doesn't need fancy gyms or large resources for a fit body . Recently I visited an akhaada in interior Maharashtra and was inspired by the fitness levels. They used their own body weight and simple props to train. One of them was a Mudgal. . Mudgals have been used in India since ancient times . . Using them Strengthens muscles, increase flexibility of the shoulders, helps body coordination, keep your spine supple and core very very strong I've been using the Mudgal for the past 6 months now . . I've accepted your #FitnessChallenge @samyuktahornad #HumFitTohIndiaFit a super initiative by @ra_rathore And I challenge my insta family to upload your fitness workouts  . . #fitnesschallenge #fitness #fitnessmotivation #fitspo #fitnessjourney #fitfam #fitmotivation #fitspiration #love

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah) on

महागड्या जीमची गरज नाही 

फीटनेस चॅलेन्जचा व्हिडियो शेअर करताना अदा शर्माने चाहत्यांना खास संदेश दिला आहे. तिच्यामते, स्वतःला फीट ठेवण्यासाठी जीममध्ये घाम गाळायची गरज नाही. महाराष्ट्रातील कुस्ती आखाड्यातील पैलवानांचा फीटनेस पाहून प्रेरणा मिळाल्याचीही तिने माहिती दिली आहे. प्राचीन काळापासून एका खास साधनाच्या (मुदगर) मदतीने पैलवान नियमित व्यायाम करतात.  

1920 द्वारा अदाने सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस अदाला बेस्ट डेब्यू अ‍ॅक्टर फीमेल हा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर अदा शर्मा दक्षिण भारतामध्ये अनेक चित्रपटांमध्ये झळकली.