'मी हिंदू आहे, कोणतं काम घाबरुन केलं नाही...'धर्मावर एकता कपूरचं सडेतोड उत्तर; कपाळावर टिका लावण्यावरुन उडवायचे खिल्ली

'द साबरमती रिपोर्ट' हा विक्रांत मैसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा यांचा सिनेमा. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. एकता कपूरने यावेळी धर्माबद्दल टिप्पणी केली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 7, 2024, 09:38 AM IST
'मी हिंदू आहे, कोणतं काम घाबरुन केलं नाही...'धर्मावर एकता कपूरचं सडेतोड उत्तर; कपाळावर टिका लावण्यावरुन उडवायचे खिल्ली

विक्रांत मॅसी, राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा यांचा 'द साबरमती रिपोर्ट' हा नवीन चित्रपट येत आहे. याची निर्मिती एकता कपूरने केली आहे. बुधवारी ट्रेलर लॉन्च करताना एकता कपूरनेही धर्मावर आपलं मत मांडल आहे, जे आता चर्चेचा विषय ठरला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

एकता म्हणाली की, मी हिंदू म्हणजे धर्मनिरपेक्ष आहे. तसेच एकता सर्व धर्मांचा आदर करतो. पण जेव्हा ती कपाळावर लाल टिका लावायची तेव्हा लोक तिची चेष्टा करायचे. असे बरेच लोक आहेत जे फार लपून छपून अशा गोष्टी करतात. एकता कपूरचे हे वक्तव्य सोशल मीडियावर सध्या जोरात प्रमाणाच व्हायरल झालं आहे. 

'द साबरमती रिपोर्ट'चा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम बुधवारी पार पडला. पत्रकारांशी बोलताना एकता कपूरने अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. सिनेमाबद्दल एकता भरभरून बोलली. तिने सांगितले की, त्यांच्या संपूर्ण टीमने एक अतिशय सुंदर चित्रपट बनवला आहे ज्यामध्ये कोणालाही लक्ष्य केले गेले नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

धर्माबद्दल काय म्हणाली एकता कपूर?

एकता कपूर म्हणाली, 'मी आयुष्यात कधीही भीतीपोटी काम केले नाही. मी हिंदू आहे. हिंदू म्हणजे धर्मनिरपेक्ष. मी कधीही कोणत्याही धर्मावर भाष्य केलेले नाही. पूर्वी मी कपाळावर टिका लावायची तेव्हा माझ्यावर खूप विनोद व्हायचा. माझा स्वतःचा धर्म पाळल्यामुळे मला ट्रोल करण्यात आले. अंगठ्या आणि ब्रेसलेट घालण्याचीही खिल्ली उडवली गेली. काही लोक गुपचूप पूजा करतात. पण काही लोक या गोष्टी लपून छपून करतात पण तसं करण्याची काहीच गरज नाही. 

'द साबरमती रिपोर्ट'चा ट्रेलर रिलीज

27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनेची सत्यता दाखवणारा साबरमती अहवाल तयार करण्यात आला आहे. चित्रपटात विक्रांत मैसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा मुख्य भूमिकेत आहेत. बालाजी मोशन पिक्चर्स आणि विकीर फिल्म्स प्रोडक्शनने हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More