"मला थेरपी घ्यावी लागली, पाच वर्षापूर्वी...", करण जोहरनं केला धक्कादायक खुलासा

करण जोहरने चॅट शो 'Koffee With Karan 7' च्या शेवटच्या भागात धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर करणला खूप ट्रोल केले जाते, ज्याबद्दल करणने त्याचा अनुभव शेअर केला.

Updated: Sep 30, 2022, 04:54 PM IST
"मला थेरपी घ्यावी लागली, पाच वर्षापूर्वी...", करण जोहरनं केला धक्कादायक खुलासा title=

Karan Johar Confesses Struggling With Mental Health Issues: करण जोहरने चॅट शो 'Koffee With Karan 7' च्या शेवटच्या भागात धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर करणला खूप ट्रोल केले जाते, ज्याबद्दल करणने त्याचा अनुभव शेअर केला. या भागात करण जोहरनं आपल्या मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने सांगितले. सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे तन्मय भट्ट, कुशा कपिला, दानिश सैत, निहारिका एनएम हे शेवटच्या भागात आले होते. 

'कॉफी विथ करण'च्या शेवटच्या भागात करणला विचारण्यात आलं की, इतक्या नकारात्मकतेचा कसा सामना करतो? या प्रश्नावर उत्तर देताना करण म्हणाला की, इतक्या वर्षात हे सगळं ऐकून मला या सगळ्याची सवय झाली आहे. खरे सांगायचे तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही. लोक माझ्या मुलांनाही शिव्या देऊ लागले. माझ्याबद्दल, माझ्या लैंगिकतेबद्दल तुम्हाला जे काही म्हणायचे म्हणा, पण मुलांबद्दल काहीही बोलू नका.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करणने पुढे  सांगितले की, "5 वर्षांपूर्वी मला एंग्जाइटीची समस्या होती. त्यावेळी मला थेरपी घ्यावी लागली. डॉक्टरांनी सांगितले की, फरक पडत नसला तरी तुम्ही या गोष्टी आतून दाबून ठेवता, ज्या कधीकधी बाहेर येतात. तुम्ही असे करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी लोकांशी याविषयी बोलू लागला. त्याला आता बरे वाटत आहे."