...तर 'जब वी मेट'मध्ये मी आणि बॉबी देओल असतो; भूमिका चावलाचा मोठा खुलासा

Bhumika Chawla Birthday Special : आज भूमिकाचा 45 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या करिअर विषयी काही कोणालाही न माहिती असलेल्या गोष्टी जाणून घेऊया...

दिक्षा पाटील | Updated: Aug 21, 2023, 09:35 AM IST
...तर 'जब वी मेट'मध्ये मी आणि बॉबी देओल असतो; भूमिका चावलाचा मोठा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Bhumika Chawla : मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री भूमिका चावला तिच्या स्मित हास्यासाठी ओळखली जाते.  भूमिका चावलाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानसोबतचा तिचा चित्रपट 'तेरे नाम' चित्रपटावर बोलली आहे. तो चित्रपट हिट होऊनही ती पुढे यशस्वी अभिनेत्री का होऊ शकली याबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी भूमिकानं तिला 'जब वी मेट' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकांची ऑफर देण्यात आली होती, परंतु विविध कारणांमुळे त्या भूमिका अखेरीस करीना कपूर आणि विद्या बालन यांच्याकडे गेल्या हा देखील खुलासा केला. 

भूमिकाने 2003 मध्ये सतीश कौशिक दिग्दर्शित ‘तेरे नाम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट हिट झाला असला तरी, त्यानंतरच्या भूमिका मिळविण्यासाठी तिच्यासाठी मार्ग सोपा नव्हता. आरजे सिद्धार्थ काननसोबतच्या एका मुलाखतीत, भूमिकाने म्हटले केले की तिला 'तेरे नाम' नंतर अनेक ऑफर मिळाल्या होत्या, परंतु ती तिच्या निवडीबद्दल निवडक होती. तिने 'तेरे नाम' नंतर एक महत्त्वपूर्ण चित्रपट साइन केल्याचे आठवते, परंतु निर्मितीतील बदल आणि इतर कारणांमुळे, चित्रपट कधीच सुरु झाला नाही. तिने सांगितले की तिने या चित्रपटासाठी इतर कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन न करता वर्षभर त्या चित्रपटाची प्रतिक्षा पाहिली. त्यानंतर तिने आणखी एक चित्रपट साइन केला जो देखील चालला नाही. तिने यावेळी सांगितले की चित्रपटसृष्टीत काम करणे आणि यश मिळवणे हे एखाद्या जुगारासारखेच आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहीद कपूर आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'जब वी मेट' या चित्रपटासाठी भूमिका ही पहिली पसंत होती असे देखील तिने उघड केले. मात्र, ऐन वेळेला तिला काढून करीनाला चित्रपटात घेण्यात आले, भूमिकामे व्यक्त केले की तिला या गोष्टीचे खूप वाईट वाटले होते. याविषयी बोलताना भूमिका म्हणाली, 'सुरुवातीला मी आणि बॉबी देओल या चित्रपटात होतो आणि चित्रपटाचे नाव होते 'ट्रेन'. नंतर त्यांनी शाहिद कपूर आणि मी असं ठरवलं, त्यानंतर आयेशा टाकियासोबत शाहिद आणि शेवटी करीना कपूरसोबत शाहिद असे बदलले. हा एकच असा चित्रपट होता त्यातून मला काढल्यामुळे मी निराश झाले होते'.

पुढे जाऊन तिने दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत 'मुन्ना भाई एमबीबीएस' आणि 'कन्नाथिल मुथामित्तल' साइन केले होते, परंतु ते प्रोजेक्ट देखील तिच्या हातून निसटून गेले. काही वर्षांनी जेव्हा ती दिग्दर्शक राजकुमार हिरानी याना भेटली तेव्हा त्यांनी तिला सांगितले की तिला दुसऱ्या व्यक्तीचा चुकीमुळे चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. 

हेही वाचा : 20 रुपयांचे मासिक 100 रुपयाला, ममता कुलकर्णीच्या टॉपलेस फोटोशूटने उडाली होती खळबळ

'जब वी मेट' नं करीनाच्या करिअरला एका उंचीवर नेऊन पोचवलं, तर भूमिकाने दक्षिण भारतीय चित्रपटात अनेक प्रमुख चित्रपटांमध्ये काम करणे सुरू ठेवले. अलीकडेच भूमिका 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती, जिथे ती सलमान खानसोबत पुन्हा एकत्र आली होती. मात्र, यावेळी तिने वेगळ्या भूमिकेत. या चित्रपटात तिनं पूजा हेगडेच्या वहिनीची भूमिका साकारली.