श्रीदेवीच्या धाकट्या मुलीसोबत डेब्यू करतोय सैफचा मुलगा इब्राहीम अली खान! करण जोहर करणार लाँच

हिंदी सिनेमाची सुपस्टार सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. गेले अनेक दिवस इब्राहिम त्याच्या पहिल्या सिनेमासाठी चर्चेत आहे. मात्र आता त्याच्याबद्दल एक बातमी समोर येतेय जी ऐकून सैफच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लवकरच सैफचा मुलगा त्याच्या डेब्यूसाठी खूश आहेत. छोट्या नवाबच्या डेब्यू सिनेमाचे मोठं अपडेट समोर आलं आहे.

Updated: Dec 12, 2023, 05:11 PM IST
श्रीदेवीच्या धाकट्या मुलीसोबत डेब्यू करतोय सैफचा मुलगा इब्राहीम अली खान! करण जोहर करणार लाँच title=

मुंबई : हिंदी सिनेमाची सुपस्टार सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. गेले अनेक दिवस इब्राहिम त्याच्या पहिल्या सिनेमासाठी चर्चेत आहे. मात्र आता त्याच्याबद्दल एक बातमी समोर येतेय जी ऐकून सैफच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लवकरच सैफचा मुलगा त्याच्या डेब्यूसाठी खूश आहेत. छोट्या नवाबच्या डेब्यू सिनेमाचे मोठं अपडेट समोर आलं आहे.

समोर आलेल्या बातमीनुसार, इब्राहिम अली खान त्याचा पहिल्या सिनेमात 'द आर्चीज' (The Archies) फेम अभिनेत्री खुशी कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. खास गोष्ट ही आहे की, या सिनेमाचा निर्माता दुसरा तिसरा कोणी नसून करण जोहर असणार आहे. 

इब्राहिम अली खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचा चाहता वर्ग खूप उत्सुक आहे. एकीकडे जवळपास आत्तापर्यंत इब्राहिमसोबतच्या सगळ्या स्टारकिड्सचा बॉलिवूडमध्ये डेब्यू झाला आहे. आता इब्राहिमही त्याच्या डेब्यू फिल्मसाठी सज्ज झाला आहे. मात्र त्याच्या चाहत्यांना या साठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. इब्राहिमच्या पहिल्या चित्रपटाला थोडा वेळ लागू शकतो.
 
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, इब्राहिम अली खानचा पहिला सिनेमासाठी मोठी अपडेट समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार. या सिनेमात इब्राहिम आणि खुशी कपूर रोमान्स करताना दिसणार आहेत. निर्माता करण जोहर रोम-कॉम चित्रपटाच्या तयारीत आहे. याच सिनेमात  मुख्य लीड स्टार कास्टमध्ये इब्राहिम आणि खुशीच्या नावाची चर्चा आहे, 
 
मात्र या दोघांच्या नावांची जरी चर्चा असली तरी यासंदर्भातील अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र असं झालं तर करण जोहरच्या सिनेमातून आणखीन एक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल. याआधी अनेक स्टारकिड्सना करण जोहरने लॉन्च केलं आहे. 'द आर्चीज' या सिनेमातून दिवंगत अभिनेत्री  श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली द अर्चीज द्वारे खुशी कपूरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. सध्या या सिनेमामुळे खुशी कपूर खूप चर्चेत आहे.
 
बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिक जोया अख्तरचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून किंग खानची लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर हे तिघेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.