मुंबई : कोणताही कलाकार काम करताना त्यामध्ये जीव ओतून करतो. अभिनय करताना त्यामध्ये प्रत्येक कलाकार जीव ओतत असतो. मग त्यांना कितीही संकटानां सामोरं जावं लागलं तरीही. टीव्ही शो 'इमली' (Imlie) मधील अभिनेत्री मयुरी देशमुखसोबत अशी वेळ आली आहे. मयुरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच खूप कौतुक होत आहे.
टीव्ही सीरियल 'इमली'मध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या मालिनी म्हणजेच मयुरी देशमुखचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शॉट देताना दिसत आहे. मयुरीच्या हातात एक मोठा फोटो आहे. ज्याला आग लावली जात आहे. मयुरी थोडी घाबरलेली दिसते. या आगीचे लोट मयुरीच्या साडीजवळही पोहोचतात आणि ती स्वतःला वाचवते.
मयुरी देशमुखने मोठ्या हिंमतीने स्वतःचा जीव वाचवला. कारण आगीने तिच्या साडीला कुठेही स्पर्श केला नाही. यावेळी खूप मोठा अपघात होता होता वाचला. मात्र चाहत्यांच्या आशीर्वादामुळे मयुरी आज सुखरूप आहे.
'इमली' ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत आपल्या प्रतिस्पर्धी मालिकांना मागे टाकत आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेला हा शो आज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे आणि त्यातील प्रत्येक पात्राला भरभरून प्रेम मिळत आहे. ही मालिका सुंबूल तौकीरने साकारलेली 'इमली' नावाच्या मुलीची कथा असली तरी या मालिकेत मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख देखील मुख्य भूमिकेत आहे.
या मालिकेत मयुरी देशमुख मालिनीची भूमिका साकारत आहे. मयुरी देशमुख खऱ्या आयुष्यात अगदी साधेपणाने जगते. मालिकेत आपल्या मोहक हास्याने सर्वांची मनं जिंकणाऱ्या मयुरीचं खासगी आयुष्य खूप शांत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मयुरीचे पती, अभिनेते आशुतोष भाकरे यांनी आत्महत्या केली होती. 20 जानेवारी 2016 रोजी दोघांचे लग्न झाले होते.