Imran Khan Smelly Unwashed T-Shirts : बॉलिवूड अभिनेता इमरान खान हा सध्या अभिनय आणि चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. 'जाने तू... या जाने ना' या चित्रपटामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. या चित्रपटात त्याने जय हे पात्र साकारले होते. या चित्रपटाने सर्वांचीच मन जिंकली. यानंतर तो 'आय हेट लव स्टोरीज', 'दिल्ली बेली', 'मेरे ब्रदर की दुल्हन', आणि 'एक मैं और एक तू' यांसारख्या अनेक चित्रपटात झळकला. पण 'गोरी तेरे प्यार में' आणि 'कट्टी बत्ती' या चित्रपटाच्या अपयशानंतर त्याने काम करणं बंद केले. आता इमरान खानच्या 'दिल्ली बेली' या चित्रपटाचा एक किस्सा समोर आला आहे.
इमरान खान हा त्याच्या प्रत्येक चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी प्रचंड मेहनत घेत असे. 'दिल्ली बेली' हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात त्याने ताशी हे पात्र साकारले होते. या संपूर्ण चित्रपटादरम्यान त्याने घाणेरडा शर्ट परिधान केला होता. त्याच्या शर्टमधून दुर्गंध येत होता, असा खुलासा त्याची वेशभूषाकार निहारिका भसीनने केला आहे.
नुकतंच निहारिका भसीनने एक मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी ती म्हणाली, "दिल्ली बेली या चित्रपटावेळी इमरान खानने घाणरेडा शर्ट परिधान केले होते. त्याच्या शर्टातून खूप दुर्गंध येत होता. या चित्रपटात इमरान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे रस्त्यावर धावतात. त्यांच्या शर्टाला सिमेंटचे डाग लागले आहेत. ते खूप घामाघुम झाले आहे. दिल्लीतील चांदनी चौकात भर उन्हात हे घडतंय असं दाखवण्यात आलं होतं. यामुळे मी त्याच्या शर्टावर काही विशिष्ट गोष्टी पात्राची गरज म्हणून लावल्या होत्या. त्यामुळे मी ते शर्ट धुवू देखील शकत नव्हती. ते शर्ट पाहून इमरान दररोज म्हणायचा की, कृपया कोणीतरी माझं शर्टाला परफ्यूम लावून द्या. पण हे खूपच भयानक होते. पण इमरान खरोखरच ते घाणेरडे शर्ट घालून सीन केला होता", असा किस्सा निहारिका भसीनने सांगितला.
"विशेष म्हणजे या चित्रपटात नवाजुद्दीने या चित्रपटात एका रस्त्यावरील विक्रेत्याची चप्पल परिधान केली होती. मी ती चप्पल रस्त्यावरील एका विक्रेत्याकडून उधार घेतली होती. त्याऐवजी त्याला नवीन शूज दिले होते. 'दिल्ली बेली'च्या वेळी संपूर्ण शूटिंगदरम्यान नवाजुद्दीने ती चप्पल परिधान केली होती", असेही निहारिकाने म्हटले.
दरम्यान 'दिल्ली बेली' हा चित्रपट 2011 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात इमरान खान, वीर दास आणि कुणाल रॉय हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाची निर्मिती इमरान खानचा मामा आणि अभिनेता आमिर खानने केली होती.