sukh mhanje nakki kay: गौरीने विजेतेपद पटकावल्यावर जयदीपला बसला धक्का?

आता गौरीने विजेतेपद पटकावल्यावर पुढे काय नवा ट्विस्ट पाहायला मिळणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated: Aug 5, 2021, 08:59 PM IST
 sukh mhanje nakki kay: गौरीने विजेतेपद पटकावल्यावर जयदीपला बसला धक्का?
मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' या मालिकेत दाखवला जाणारा साध्या-भोळ्या गौरीचा प्रवास प्रेक्षक चांगलेच एन्जॉय करत आहेत. तिच्या प्रत्येक चढ-उतारात प्रेक्षक सुद्धा सामील होत आहेत.
 
त्यात आता गौरी यशाची पायरी चढणार आहे. नुकताच समोर आलेला मालिकेचा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात गौरीने 'मिसेस कोल्हापूर' हा मान पटकावला आहे. या स्पर्धेत गौरीसह तिच्या दोन्ही वहिनींनी देखील सहभाग घेतला होता. पण शिर्के-पाटील घराण्याची छोटी सून हा मान पटकावताना दिसणार आहे.

गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू सध्या सगळ्यांचीच फेवरेट बनली आहे. तिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहतावर्ग आहे.

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आता गौरीने विजेतेपद पटकावल्यावर पुढे काय नवा ट्विस्ट पाहायला मिळणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.