'Indian Idol 12'च्या मंचावर 'बचपन का प्यार' फेम सहदेवची एन्ट्री, पाहा फोटो

स्मॉल स्क्रिनवरील इंडियन आयडॉल 12 (Indian Idol 12) हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. 

Updated: Aug 5, 2021, 08:28 PM IST
 'Indian Idol 12'च्या मंचावर 'बचपन का प्यार' फेम सहदेवची एन्ट्री, पाहा फोटो

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील इंडियन आयडॉल 12 (Indian Idol 12) हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. त्यामुळे हा शो अधिक रंचक करण्याची निर्माते जमेल ते प्रयत्न करताना दिसतायेत.  या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असून एक्स इंडियन आयडल स्पर्धक देखील सहभागी होत आहेत. 

ग्रँड फिनालेची जोरदार तयारी होत असून सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झालेला एक मुलगा या मंचावर येणार आहे. सोशल मीडिया सन्सेशन सहदेवला शो मध्ये आमंत्रित करण्यात आल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सहदेव केवळ शो मध्ये सहभागी होणार नाही तर पवनदीप सिंह सोबत परफॉर्म देखील करणार आहे.

या कार्यक्रमातील सर्व कलाकार आणि गायक सहदेवसोबत त्याच्या व्हायरल गाण्यावर परफॉर्म देखील करणार आहेत.

सहदेवचे 'बचपन का प्यार' हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यावर सामान्यांसह सेलिब्रिटींनी देखील व्हिडिओ बनवले आहेत. त्यामुळे सहदेवची शो मधील एन्ट्री अनेकांसाठी उत्सुकता निर्माण करणारी ठरु शकते. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवरुन सहदेव इंडियन आयडलच्या मंचावर दिसणार असल्याचं समजतंय. त्याचा तो एपिसोड या आठवड्याच्या शेवटी प्रसारित होईल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत सहदेव पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे.