Super Dancer Chapter 4 : शिल्पा शेट्टीच्या एक्झिटनंतर करिश्मा ढसा-ढसा रडली

परिक्षकाच्या खुर्चीत बसताच करिश्माच्या डोळ्यात पाणी आलं. 

Updated: Jul 25, 2021, 09:40 PM IST
Super Dancer Chapter 4 : शिल्पा शेट्टीच्या एक्झिटनंतर करिश्मा ढसा-ढसा रडली title=

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील सुपर डान्सर चॅप्टर 4 (Super Dancer Chapter 4) ची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. नुकतीच या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने गेस्ट म्हणून हजेरी लावली. या आठवड्यात शोमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या जागी करिश्मा कपूर परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर शिल्पा शेट्टीला शोच्या शुटींग साठी येत आलं नाही.

परिक्षकाच्या खुर्चीत बसताच करिश्माच्या डोळ्यात पाणी आलं. दमदार परफॉर्मन्स पाहून करिश्माने स्पर्धेकांचं यावेळी तोंड भरुन कौतुक देखील केलं आहे.

या डान्स शोमधील पृथ्वीराज आपल्या गुरुसोबत करिश्माच्या फूलों सा चेहरा तेरा या गाण्यावर परफॉर्मनस करणार आहेत.या परफॉर्म्नसमध्ये करिश्मा कपूरच्या बालपणीपासून ते बॉलिवूडमधील करिअरपर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. करिश्माचे वेगवेगळे फोटोज यावेळी लावण्यात आले. 

करिश्माच्या डोळ्यात आलं पाणी

स्पर्धक पृथ्वीराजचा परफॉर्मन्सपासून करिश्मा कपूर इमोशनल झाली. परफॉर्मन्स पाहिल्यानंतर करिश्माला आपले अश्रू अनावर झाले होते, करिश्माने डान्स पाहिल्यानंतर आपण खूपच भावूक झाल्याचं म्हटलं आहे. सोबतच तिने स्पर्धकांचे आभार मानले आहेत.

या डान्स रियालिटी शोमध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार स्पर्धेकांचा उत्साह वाढवण्यासाठी या मंचावर येत असतात.