'Taarak Mehta...'च्या दिशा वाकाणीला आता टक्कर देणार नवीन दयाबेन?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा एकमेव कॉमेडी शो आहे जो सर्व वयोगटातील लोकांचा आवडता आहे. 

Updated: Oct 15, 2021, 03:46 PM IST
 'Taarak Mehta...'च्या दिशा वाकाणीला आता टक्कर देणार नवीन दयाबेन? title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा एकमेव कॉमेडी शो आहे जो सर्व वयोगटातील लोकांचा आवडता आहे. या शोमधील प्रत्येक कलाकार अगदी हटके आहेत. हा शो गेली 13 वर्षे प्रेक्षकांचा आवडता राहिला आहे. या शोच्या टीआरपीबद्दल बोलायचे झाले तर हा शो नेहमी टॉपला असतो.

जरी 'तारक मेहता' च्या प्रत्येक पात्राचे स्वतःचे स्थान असले, तरी या शोमधील जेठालालची पत्नी दयाबेनचा सर्वांत मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

दयाबेन आजकाल शोमध्ये दिसत नाहीत, पण चाहते त्यांच्या एन्ट्रीची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तुम्हाला नवीन दयाबेन पाहून नक्कीच आनंद होईल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

'तारक मेहता' चे चाहते दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणी यांना खूप मिस करतात. त्यामुळे एक चाहतीने दयाबेन प्रमाणे अ‍ॅक्टींग करत व्हिडिओ बनवत आणि पोस्ट केला आहे. तर काहींनी दयाभाभीवर अनेक मजेदार मीम्स देखील बनवले जातात. दिशा वाकाणी यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात छोटी फॅन त्यांची नक्कल करताना दिसत आहे.