भारतीय चित्रपटांविषयी दीपिकाचं लक्षवेधी वक्तव्य

'मुंबई अॅकॅडमी ऑफ मूविंग इमेज'च्या अध्यक्षपदी दीपिकाची नियुक्ती

Updated: Mar 22, 2019, 12:16 PM IST
भारतीय चित्रपटांविषयी दीपिकाचं लक्षवेधी वक्तव्य title=

नवी दिल्ली : यंदा वर्षाच्या सुरूवातीलाच दीपिकाची 'मुंबई अॅकॅडमी ऑफ मूविंग इमेज'च्या (एमएएमआय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय चित्रपटांविषयी दीपिकाने लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. 'भारतीय चित्रपटांना लवकरच जगभरात ओळख मिळेल' असा विश्वास बॉलिवूड मस्तानी दीपिका पदूकोणने व्यक्त केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'झी सिने अॅवॉर्ड्स 2019' या कार्यक्रमावेळी दीपिका बोलत होती. 

 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाने भारतीय चित्रपटांबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. 'मी हे पद स्वीकारण्यासाठी तयार झाली कारण, मला वाटतं की तरूणांना अशाप्रकारच्या संघटना, आंदोलनासारख्या गोष्टींचा भाग होणं महत्त्वाचं, गरजेचं आहे जे खरोखरच बदल घडवून आणतात. आपलं भविष्य आपल्या हातात आहे. मला वाटतं की भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर लवकरच ओळख मिळेल. मी आशा करते की आपण याला एका नवीन उंचीवर घेऊन जाण्यास नक्कीच यशस्वी होऊ.' असं दीपिकाने म्हटलंय.

दीपिका पादुकोण ने बर्थडे को बनाया यादगार, फैंस को दिया यह खास तोहफा

सध्या दीपिका तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. 'छपाक'च्या चित्रीकरणासाठी दीपिका लवकरच दिल्लीला रवाना होणार आहे. मेघना गुलजार 'छपाक'चं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात दीपिका एका अॅसिड हल्ला झालेल्या पिडितेची भूमिका साकारणार आहे.

लंडनमधील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात दीपिकासारखाच दिसणारा अगदी हुबेहुब मेणाचा पुतळा साकारण्यात आला. या पुतळ्याचं दीपिकाच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. दीपिका सध्या तिच्या उभारण्यात आलेल्या मेणाच्या पुतळ्यामुळे चर्चेत आहे.