INDIAN IDOL सायली कांबळेला मिळाली मोठी ऑफर

सायली आता उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Updated: Aug 18, 2021, 10:48 AM IST
 INDIAN IDOL सायली कांबळेला मिळाली मोठी ऑफर title=

मुंबई : 'इंडियन आयडन 12'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. पवनदीप राजनने यंदाच्या पर्वाचं विजेतेपद पटकावलं. तर अरुणीता कांजीलाल आणि सायली कांबळे  या टॉप 3 फायनलिस्ट ठरल्या. इंडियन आयडल या कार्यक्रमातून अनेक गायक-गायिकांचं करिअर घडवलं आहे. यातच आता फायनलिस्ट सायली कांबळेलाही खास  ऑफर मिळाली आहे.

सायली आता उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी सिनेमासाठी गाण्याची संधी सायलीकडे चालून आली आहे.

यंदाच्या पर्वात सायली कांबळे हे नाव चांगलच चर्चेत आलं होतं. तिच्या गायनकौशल्यासोबतच तिचे आई-वडीलही या कार्यक्रमातून चर्चेत आले. या कार्यक्रमातून  सायलीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिच्या एकापेक्षा एक परफॉर्मन्सने परिक्षकांची मनं जिंकली आहेत. 

'कोल्हापुर डायरीज' या मराठी सिनेमासाठी सायलीने गाणं रेकॉर्ड केलं आहे. प्रसिद्ध संगीतकार, गायक अवधुत गुप्तेने या सिनेमाची गाणी कम्पोझ केली. जोई राजन यांनी  या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

कोल्हापुर डायरीज हा मल्याळम ब्लॉकबस्टर सिनेमा अन्गामाली डायरीजचा रिमेक आहे. या सिनेमात अभिनेता भूषण पाटील आणि  अभिनेत्री गायत्री दातार झळकणार आहे. नुकतच या सिनेमासाठी गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे.

संगीतकार, गायक, फिल्ममेकर अवधूत गुप्ते म्हणतात, "आमचे दिग्दर्शक जो राजन ह्यांना सायलीचा आवाज खूप आवडला होता. त्यामुळे त्यांनीच मला सायलीचे नाव  ह्या गाण्यासाठी सुचवले. ती किती उत्तम गायिका आहे, ते ती दरवेळी सिद्ध करते. सायलीच्या रूपाने एक टॅलेंटेड गायिका महाराष्ट्रालाच नाही तर अख्या जगाला  मिळालीय, असं मला वाटतं. "