Indian Idol च्या सेटवर साफसफाई करणाऱ्या मराठमोळ्या तरूणाने जिंकल प्रेक्षकांच मन

गाणं ऐकून परिक्षकही झाले भावूक 

Updated: Nov 26, 2020, 01:22 PM IST
Indian Idol च्या सेटवर साफसफाई करणाऱ्या मराठमोळ्या तरूणाने जिंकल प्रेक्षकांच मन  title=

मुंबई : कलाकारातील कलेला ओळख मिळवून देण्यासाठी Indian Idol हा छोट्या पडद्यावर लोकप्रिय रिऍलिटी शो आहे. या कार्यक्रमाने अनेकांना ओळख मिळवून दिली आहे. इंडियन आयडलचा यंदाचा सिझन सुरूवातीलाच एका वेगळ्या व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. 

या व्हिडिओतील स्पर्धकाची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. इंडियन आयडलच्या सेटवरच साफसफाई करणाऱ्या मराठमोळ्या तरूणाच्या आवाजाने नेहा कक्कड, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया अतिशय भावूक झाले.

स्पर्धक युवराज मेढेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने 'खेळ मांडला' हे गाणं गायलं. त्याच्या या गाण्याने परिक्षकांसोबतच नेटीझन्सचं मन देखील जिंकल आहे. 

युवराजने गाणं गायल्यावर सांगितलं की, तो सेटवरच साफसफाईचं काम करतो. परिक्षक इतर स्पर्धकांना जे मार्गदर्शन करतात त्यामधून तो शिकला आहे. २८ नोव्हेंबरला हे सिझन सुरू होत आहे. पण त्या अगोदरच युवराजची चर्चा रंगली आहे.