इंडियन आयडॉल 12चं विजेतेपद पटकवणारा पवनदिप आहे इतक्या कोटींचा मालक, संपत्ती ऐकून बसेल धक्का

पवनदीपचा जन्म 27 जुलै 1996 रोजी चंपावत, उत्तराखंड येथे एका सामान्य कुटुंबात झाला. 

Updated: Sep 27, 2021, 06:11 PM IST
 इंडियन आयडॉल 12चं विजेतेपद पटकवणारा पवनदिप आहे इतक्या कोटींचा मालक, संपत्ती ऐकून बसेल धक्का

मुंबई : इंडियन आयडॉल 12 मध्ये आपलं गायन कौशल्य दाखवून प्रत्येकाची मने जिंकणारा पवनदीप राजनने इंडियन आयडॉलची ट्रॉफी जिंकलीच नाही तर भरपूर पैसेही कमावले. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसल्याचं त्यानं सिद्ध केलं आहे. तुमच्या मेहनतीने काहीही साध्य करता येते. विजेतेपद पटकावल्यानंतरही पवनदीप आपला प्रवास सुरू ठेवला आहे. उत्तराखंडहून आलेल्या पवनने पहाडी गाण्यांद्वारे गायनात पदार्पण केलं आहे. लोकांना त्याच्या मधुर आवाजात गाणं ऐकायला खूप आवडतं.

पवनदीपचा जन्म 27 जुलै 1996 रोजी चंपावत, उत्तराखंड येथे एका सामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्याला गाण्याची खूप आवड होती. त्याचे वडील देखील कुमाऊनीचे प्रसिद्ध गायक आहेत. जेव्हा तो फक्त दीड वर्षांचा होता. तेव्हा त्याच्या त्याच्या वडिलांनी तबला भेट म्हणून दिला होता.

पवनदीपच्या एकूण मालमत्तेबद्दल बोलायचं झालं तर, एका रिपोर्टनुसार, त्याची एकूण मालमत्ता 7 कोटी आहे. तो वार्षिक 10-20 लाख रुपये कमवतो. या व्यतिरिक्त, तो काही स्थानिक ब्रॅण्ड्सचं देखील समर्थन करतो ज्यातून त्याला चांगली रक्कम मिळते. 2016 मध्ये उत्तराखंड सरकारने त्याला युथ बॉण्ड अॅम्बेसेडर बनवलं. पवनदीपकडे दोन कार आहेत. त्यांच्याकडे एक महिंद्रा एक्सयूव्ही 500 आणि एक मारुती स्विफ्ट कार आहे.