मी राज कुंद्रा आहे का? नवऱ्याबद्दल प्रश्न विचारताच संतापली होती शिल्पा शेट्टी

काही दिवसांपूर्वी राज कुंद्राला जामीन मिळाला आहे. 

Updated: Sep 27, 2021, 04:49 PM IST
 मी राज कुंद्रा आहे का? नवऱ्याबद्दल प्रश्न विचारताच संतापली होती शिल्पा शेट्टी

मुंबई : यात काहीच शंका नाही की, शिल्पा शेट्टीच्या हसण्या -खेळण्याच्या जीवनात काही दिवसांपूर्वी भूकंप झाला होता. जेव्हापासून तिचा पती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तिला एकामागून एक अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत होती. तिने बऱ्याचवेळा स्पष्ट केलं की, तिला याबद्दल काहीच माहिती नाही. पण तिच्या उत्तरानं कोणीही समाधानी नव्हतं. किंवा प्रश्न थांबले नाहीत. एक काळ होता जेव्हा दोघांच्या नात्याची सगळीकडे चर्चा होती आणि आता हे नातं शिल्पासाठी एक सापळा बनला आहे.

जेव्हा शिल्पा मीडियावर चिडली
राज कुंद्रा तुरुंगात गेल्यानंतर शिल्पा सगळ्या प्रकारच्या प्रश्न आणि शंकाखाली आली होती. एका रिपोर्टनुसार, राज बद्दल शिल्पाला प्रश्न विचारल्यावर शिल्पा इतकी संतापली होती की, ती म्हणाली, 'मी राज कुंद्रा आहे. का?  मी त्याच्यासारखी दिसते का? नाही मी कोण आहे? यानंतर, तिने पुढे स्पष्ट केलं की, एक सेलिब्रिटी म्हणून तिने तक्रार करणं किंवा सफाई देणं शिकली आहे.

काही दिवसांपूर्वी राज कुंद्राला 50,000 रुपयांच्या बाँडवर जामीन मिळाला. राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिल्पाने एक अतिशय भावनिक संदेश लिहिला ज्यात ती म्हणाली, 'आपण सर्वांनी ऐकलं आहे की, दुःख आपल्याला मजबूत बनवतं आणि आपण आपल्या अडचणींमधून शिकतो. हे खरं असू शकतं, मात्र आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. कठीण काळ आपल्याला चांगलं बनवत नाही. परंतु कठीण काळातून जाणं आपल्याला चांगलं बनवतं. मी इतरां इतकाच वाईट काळाचा तिरस्कार करते. पण मला माहित आहे की, मी त्यांच्याशी सामना करण्यासाठी आणि त्यांच्यावर लवकरच मात करण्यासाठी पुरेसं सामर्थ्यवान आहे.