अरुणितासाठी धोक्याची घंटा, 'या' गायिकेशी 'कांटे की टक्कर'

अरुणिताच्या लोपप्रियतेत घट होण्याची शक्यता, आता 'या' गायिकेचा बोलबाला

Updated: Oct 20, 2021, 10:55 AM IST
अरुणितासाठी धोक्याची घंटा, 'या' गायिकेशी 'कांटे की टक्कर'

मुंबई : 'इंडियन आयडल 12' (Indian Idol 12) रनर-अप अरुणिता कांजिलालने तिच्या गोड आवाजाने रसिकांच्या मनात राज्य केलं आहे. एवढंच नाही शो संपल्यानंतर देखील तिचे चाहते अरुणिताचा आवाज ऐकण्यासाठी व्याकूळ असतात. तिला केवळ कौतुकचीचं थाप मिळाले नाही तर शोचा जज हिमेश रेशमियाने तिला 'इंडियन आयडॉल 12' विजेता पवनदीप राजनसोबत काही नवी गाणी गाण्याची संधी दिली. दोघांनी गायलेली गाणी आज ब्लॉकबस्टर ठरली.

पण यशाच्या शिखरावर चढत असताना अरुनिताला 'कांटे की टक्कर' द्यावी लगाणार आहे. अरुणितासमोर टक्कर असणार आहे गायक निलांजना रायची. निलांजना यंदाच्या वर्षी 'सा रे गा मा' या शोमध्ये दिसणार आहे. या गायिकेने यापूर्वी इंडियन आयडल 10 मध्ये भाग घेतला होता आणि ती टॉप 10 पर्यंत पोहोचली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही दिवसांपू्र्वी  जेव्हा निलंजनाने सर्व ज्युरी सदस्यांसमोर आणि शंकर महादेवन, विशाल आणि हिमेश रेशमिया यांच्यासमोर गायिका लता मंगेशकर यांचे प्रसिद्ध गाणं "बीते ना बीताय रैना" गायले तेव्हा तिला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. निलंजनाच्या आवाजाची जादू हिमेश रेशमियाच्या मनावर झाली आणि त्याने निलंजनाला मोठं वचण दिलं. 

यावेळी हिमेश मंत्रमुग्ध झाला आणि त्याने निलंजनाला वचन दिले की तो विशेषतः तिच्यासाठी एक सुपर-डुपर गाणे तयार करेल जे तिला एक मोठा गायन स्टार बनवेल. महत्त्वाचं म्हणजे, हिमेशने 'इंडियन आयडल 12'मधील स्पर्धकांना नवीन संधी दिल्या. एवढंच नाही तर सर्व गाण्यांना यूट्यूबवर उत्तम प्रतिसाद मिळाला.