मुंबई : छोट्या पडद्यावर असे अनेक रिअॅलिटी शो आहेत ज्यांच्यावर सोशल मीडियावर अनेकदा प्रश्न विचारण्यात येतात. यापैकी एक शो म्हणजे सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडल'. विशाल ददलानी, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया या शोचे परिक्षक आहेत. 'इंडियन आयडल 13' (Indian Idol 13) काही दिवसांपूर्वी सुरु झाला आहे आणि आता या शोचा ऑडिशन राउंड संपला आहे. शोला त्यांचे टॉप 15 स्पर्धक मिळाले आहेत. दरम्यान, नेटकरी 'इंडियन आयडॉल 13' च्या निर्मात्यांवर टीका करत आहेत. तर हा शो बनावट असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
अलीकडेच 'इंडियन आयडॉल 13' च्या टॉप 15 स्पर्धकांची नावं सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्राम पेजवर जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीत 13 व्या सीझनमध्ये ऑडिशन देण्यासाठी आलेली स्पर्धक रितो रिबा हिला 15 सर्वोत्कृष्ट स्पर्धकांमध्ये स्थान देण्यात आलं नाही. परिक्षक आणि निर्मात्यांनी चांगली कामगिरी करूनही जेव्हा 'रीतो रिबा'ला या शोमध्ये घेण्यात आलं नाही, तेव्हा नेटकऱ्यांना ते अजिबात आवडलं नाही. या टॅलेंट हंट शोला स्क्रिप्टेड असल्याचं सांगून निर्मात्यांनी 'रीतो रिबा' सोबत भेदभाव केल्याचा आरोप केला, इंडियन आयडलला खोटं म्हटलं आणि सोशल मीडियावर निर्मात्यांना सतत ट्रोल केलं.
So dissapointed not selecting #RitoRiba . Every year same quality of voice, Same Aalap, Same old Sad stories. After so many years found a voice so original and fresh like no other. @VishalDadlani I hope u wl look into this. #indianidol13 #indianidol2022
— Dipankar Borah (@itsyoursdb) September 26, 2022
Justice for Ritu Riba#IndianIdol13 smell Fishy.
— Da Revenant Robert (@robert_chongloi) September 25, 2022
आपली नाराजी व्यक्त करताना एक नेटकरी म्हणाला, 'रितो रिबाला न निवडल्यानं खूप निराश झालो. दरवर्षी तोच आवाज, तीच दु:खद कहाणी. खूप वर्षांनी असा आवाज ऐकला होता, जो कोणाचाच नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रीतो राबा टॉप 15 स्पर्धकांमध्ये येण्यास पात्र होते. त्यांना परत आणा'. तिसरा नेटकरी म्हणाला, 'एका चांगल्या कलाकाराला काढून टाकलं हे खूप दुःखद आहे. रिटो रिबाचा वाद हेच यामागचं प्रमुख कारण असावं. इतर स्पर्धकांच्या तुलनेत रितो रिबा ही सगळ्यात चांगली आहे. ती खरी कलाकार आहे'. (indian idol 13 neha kakkar himesh reshammiya vishal dadlanishow gets into trouble started boycott trend users call fake to this singing reality show)
Rito Riba is deserving contestant of Indian idol 13 #bringBackToRitoRiba #indianidol13
He is deserved to be in top 14..#WeWantRitoRiba in top 14#sonytv— Ananta Sinte (@Anatasinte123) September 25, 2022
#indianidol13
Very sad that, a good artist has been eliminated, the contravarsy in RitoRiba's audition may be the main reason. In my openion others are singers but Rito Riba has its own creation that is why he is the not only a singer but also the true form of artists. pic.twitter.com/Rt7OQF8wbv— Draveer (@Draveerd234) September 25, 2022
'इंडियन आयडॉल 13' मध्ये रितो रिबाला टॉप 15 मध्ये न टाकल्यामुळे सोशल मीडियावर लोक संतापले असताना ऑडिशन संपल्यानंतर टॉप 15 च्या यादीत स्थान मिळवलेल्या स्पर्धकांमध्ये ऋषी सिंग, बिदिप्ता चक्रवर्ती, सोनाक्षी कर, सेंजुती दास, शिवम सिंग, नवदीप वडाली, चिराग कोतवाल, काव्या लिमये, संचारी सेन गुप्ता, रूपम भरनरिया, प्रीतम रॉय, देबोस्मिता रॉय, शगुन पाठक आणि विनीत सिंग यांचा समावेश आहे.