शाहीद कपूरच्या वडिलांपासून ते बिग बॉसपर्यंत यांनी केलंय 'अॅव्हेंजर्स'मध्ये काम

  हॉलीवूड सिनेमा अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर या सिनेमाने रिलीज होताच जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलीये. 

Updated: May 2, 2018, 01:43 PM IST
शाहीद कपूरच्या वडिलांपासून ते बिग बॉसपर्यंत यांनी केलंय 'अॅव्हेंजर्स'मध्ये काम title=

मुंबई :  हॉलीवूड सिनेमा अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर या सिनेमाने रिलीज होताच जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलीये. भारतातही या सिनेमाची मोठी क्रेझ दिसून येतेय. अवघ्या तीन दिवसांतच या सिनेमाने १०० कोटींच्या क्बलमध्ये प्रवेश केला. रिलीज होण्याआधीच या सिनेमासाठीचे बुकिंग हाऊसफुल्ल होते. त्यात सलग सुट्टया आल्याने बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने छप्परफाड कमाई केली. थानोस या व्हिलनविरुद्द लढणारे सुपहिरोज अशी या सिनेमाची कथा आहे. इंग्रजी भाषेसोबतच हिंदी आणि अन्य भाषांमध्येही हा सिनेमा डब करण्यात आलाय. यालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. 

हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील तसेच अनेक व्हॉईस आर्टिस्टनी या सिनेमाला आवाज दिलाय. शाहीद कपूरच्या सावत्र वडिलांपासून ते प्रसिद्ध टीव्ही अॅक्टर गौरव चोप्रा यांनी या सिनेमाला आवाज दिलाय. तुम्ही जर मार्व्हल स्टुडिओजच्या सिनेमांचे चाहते आहात तर कोणत्या पात्राला कोणी आवाज दिलाय हे कदाचित तुम्ही ओळखले असेल. जाणून घ्या कोणत्या पात्राला कोणी दिलाय आवाज

आर्यन मॅन - राजेश खट्टर(शाहीद कपूरचे सावत्र वडिल)
थानोस - निनाद कामत
कॅप्टन अमेरिका - जॉन सेनगुप्ता
स्पायडर मॅन - वैभव ठक्कर
ब्लॅक पँथर - विराज अधव
थॉर - गौरव चोप्रा
ब्लॅक विडो - नेश्मा चेंबुरकर
हल्क - समय राज ठक्कर
कर्नल निकोलस- शक्ती सिंह
स्टार लॉर्ड - रोहित रॉय
डॉ. स्ट्रेंज - सप्तर्षी घोष
व्हिजन - अतुल कपूर

अतुल कपूर यांनी आतापर्यंत बिग बॉस या काल्पनिक पात्रालाही आवाज दिलाय. सुरुवातीला अशी बातमी होती की टायगर श्रॉफही या सिनेमाचा भाग असणार आहे. टायगरचा आवाज स्पायडर मॅनला देणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अखेरीस ही जबाबदारी वैभव ठक्करला देण्यात आली.