मधुर भांडारकरच्या 'इंदू सरकार'चा ट्रेलर लॉन्च

मधुर भांडारकरच्या 'इंदू सरकार' या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Updated: Jun 16, 2017, 09:03 PM IST
मधुर भांडारकरच्या 'इंदू सरकार'चा ट्रेलर लॉन्च title=

मुंबई : मधुर भांडारकरच्या 'इंदू सरकार' या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. इंदिरा गांधीनी भारतात पुकारलेल्या आणीबाणीच्या काळावर सिनेमा आधारित आहे. 1975 ते 1977चा कालखंड सिनेमात दाखवण्यात आला आहे.

सिनेमात किर्ती गुल्हेरी, निल नितीन मुकेश, अनुपम खेर, सुप्रिया विनोद यांच्या प्रमुख भूमिका आहेत.सिनेमातून ज्वलंत विषय मांडला असून 28 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पाहा 'इंदू सरकार'चा ट्रेलर