आमिरच्या घरी लग्नाचे वारे, उताळवळेपणात लेकिनं काय केलं एकदा पाहाच...

आयरा आणि नुपूरनं त्यांच्या नात्याला नव्या वळणावर आणत घेतला मोठा निर्णय   

Updated: Oct 3, 2022, 10:31 AM IST
आमिरच्या घरी लग्नाचे वारे, उताळवळेपणात लेकिनं काय केलं एकदा पाहाच... title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान (ira khan) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आयरा खान गेल्या दोन वर्षांपासून बॉयफ्रेंड नुपूर शिखरेला (nupur shikhare) डेट करत आहे. हे कपल अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. आता देखील आयरा आणि नुपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे खास क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे. (nupur shikhare and ira khan)

काही दिवसांपूर्वी नुपूरने आयला लग्नासाठी विचारलं आणि आयरा त्याला होकार देखील दिला. हा व्हिडीओ नुपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ... आणि तिने होणार दिला... असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तेव्हा त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. (ira khan and nupur shikhare video)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओनंतर आमिरच्या घरात सनई-चौघडे लवकरच वाजणार असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला. याच दरम्यान आयरा आणि नुपूरचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खुद्द नुपूरने पोस्ट केला आहे. ( Ira khan and nupur shikhare will get married soon)पाहा व्हिडीओ.... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे नुपूर शिखरे
नुपूर शिखर एक फिटनेस ट्रेनर (fitness trainer) आहे, तो आयरा खानला ट्रेनिंग देत आहे. नुपूर अभिनेता आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर असल्याचं बोललं जात आहे. लॉकडाऊन दरम्यान आयरा आणि नुपूरने एकमेकांना डेटिंग करायला सुरूवात केली. आयरा आणि नुपूरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.