PM Modi Gifts E-Auction: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मिळालेल्या 1200 पेक्षा अधिक भेटवस्तूंची लीलाव सुरु आहे. हा लिलाव 12 ऑक्टोबरपर्यंत सुरु असणार आहे. सर्वप्रथम हा लीलाव 17 सप्टेंबर रोजी सुरू होवून 2 ऑक्टोबरला संपणार होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वस्तूंच्या लीलावाचे दिवस वाढवण्यात आले आहेत. आता 12 ऑक्टोबरपर्यंत मोदींच्या वस्तूंचा लीलाव ऑनलाईन सुरु असणार आहे. (PM Modi Gifts E-Auction)
रविवारी या कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेत्री कंगना (Kangana Ranaut ) रानौतने देखील उपस्थित होती. शिवाय अभिनेत्रीने पीएम मोदींना मिळालेल्या 2 भेटवस्तूंवर बोली लावली. या भेटवस्तूंचे फोटो कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (Kangana Ranaut Films)
कंगनाने राम जन्मभूमीच्या माती शिवाय राम मंदिराच्या आराखड्यावर बोली लावली आहे. कंगनाने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'आज मला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांच्या लीलावाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं सौभाग्य मिळालं, जे त्यांना विशेष प्रसंगी प्रदान केले गेले. (e auction modi gifts)
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'मी रामजन्मभूमी माती आणि राम मंदिरच्या आराखड्यासाठी बोली लावली. तुम्ही कशासाठी बोली लावली? यातून येणारा पैसा नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरला जाईल. चला पण भाग घेऊया. जय हिंद.' (Kangana Ranaut on politics)
जो देश के लिए अच्छा कर रहे हैं, हम उनकी सेवा में तत्पर हैं। जो देश की सेवा कर रहे हैं उनके लिए हर तरह का प्रचार करेंगे.... अभी(चुनाव लड़ने का) कोई इरादा नहीं है। मुझे एक कलाकार की तरह राजनीति में रुचि है। राजनीति पर अच्छी फिल्में बनाएंगे: अभिनेत्री कंगना रनौत, दिल्ली pic.twitter.com/2vyRu5VDjC
— ANI_HindiNews (@AHindinews) October 2, 2022
एवढंच नाही तर कंगनाने राजकारणाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. 'जे देशासाठी चांगलं काम करत आहेत त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. देशाची सेवा करणार्यांसाठी सर्व प्रकारचा प्रचार करणार…. माझा (निवडणूक लढवण्याचा) हेतू नाही. मला कलाकार म्हणून राजकारणात रस आहे. राजकारणावर चांगले सिनेमे बनवणार.' असं देखील अभिनेत्री यावेळी म्हणाली.