PHOTO : युवराज - सागरिकाच्या फोटोवर हेझलनं दिली अशी प्रतिक्रिया

बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातलं नातं आता नवीन नाही... अशाच दोन चर्चेतल्या जोड्या म्हणजे, सागरिका घाटगे - झहीर खान आणि युवराज सिंग - हेझल किच...

Updated: Dec 28, 2017, 07:36 PM IST
PHOTO : युवराज - सागरिकाच्या फोटोवर हेझलनं दिली अशी प्रतिक्रिया title=

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातलं नातं आता नवीन नाही... अशाच दोन चर्चेतल्या जोड्या म्हणजे, सागरिका घाटगे - झहीर खान आणि युवराज सिंग - हेझल किच...

नुकत्याच झालेल्या विराट कोहली - अनुष्का शर्माच्या मुंबईत पार पडलेल्या लग्नाच्या रिसेप्शनला अभिनेत्री सागरिकानं युवराजसोबत आपला एक फोटो शेअर केला... या फोटोवर हेझलनं मात्र लटक्या पद्धतीनं तिखट प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळाली. 

 

#twinning with Mr Singh @yuvisofficial - Missed you @hazelkeechofficial . Pic courtesy @zaheer_khan34

A post shared by Sagarika (@sagarikaghatge) on

त्याचं झालं असं की सागरिका आणि युवराज दोघांनीही योगायोगानं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यानंतर सागरिकानं हा फोटो शेअर केला होता. तिनं लिहिलं "sagarikaghatge #twinningwithMrSingh @yuvisofficial-Missedyou @hazelkeechofficial . Pic courtesy @zaheer_khan34"

पण ही गोष्ट युवराजची पत्नी हेझलला काही फार रुचली नाही. आपली प्रतिक्रिया नोंदवताना हेझलनं म्हटलं 'वाटतंय मलाही झहीर खानसोबत मॅचिंग आऊटफिट परिधान करून यायला हवं होतं'

हेजल का कमेंट
हेझलची प्रतिक्रिया