Ibrahim Ali Khan and Palak Tiwari Maldives Photo : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली आणि श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीची लेक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. श्वेतानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांवर वक्तव्य करत आम्ही चांगले मित्र आहोत असं सांगितलं. त्यासगळ्यात त्या दोघांनी मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. मुलाखतीत पलकनं नकार दिला असला तरी त्यांच्या सोशल मीडियावरून काही वेगळं चित्र पाहायला मिळत असल्याचं दिसत आहे.
इब्राहिमनं काल सोशल मीडियावर त्याचे मालदीवचे फोटो शेअर केले होते. या फोटोंमधून त्यानं मालदीवमध्ये सुट्टीचा किती आनंद घेतला हे दिसत आहे. इब्राहिमनं हे फोटो शेअर करत सूर्य आणि चंद्राचे फोटो शेअर केले आहेत. तर दुसरीकडे त्या आधीच पलक तिवारीनं देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मालदीवच्या सुट्टीतील काही फोटो शेअर केले होते. पलकनं हे फोटो शेअर करत 'A vacation girl' असं कॅप्शन दिलं. इब्राहिमनं शेअर केलेल्या फोटोतून त्यानं आणि पलकनं रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर केल्याचं दिसून आल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, त्या दोघांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'तू पलकसोबत आहेस ना.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'पलक आणि इब्राहिम त्यांचं रिलेशनशिप या फोटोंमधून कन्फर्म करत आहेत.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या फोटोंवरून एक गोष्ट सिद्ध झाली तू पलकसोबत रिलेशनशिपमध्ये आहेस.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'पलक आणि इब्राहिम त्यांचं रिलेशनशिप लपवण्याचा प्रयत्न देखील करत नाही आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'पलकनं त्याचे फोटो क्लिक केले आहेत.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'पलक आणि इब्राहिम हे त्यांची डेटिंग अॅनिव्हर्सरी साजरी करत आहेत.' एक नेटकरी म्हणाला, 'पलक आणि इब्राहिम हे दोघं एकत्रच सुट्टीवर गेल्याचं दिसतंय.'
हेही वाचा : 'आम्हाला विवाहबाह्य संबंध ठेवायचे होते'; 80s च्या दशकातील 'या' लोकप्रिय कपलचं होतं Open Marriage
दरम्यान, पलक तिवारीनं सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. इब्राहिम अली खान हा लवकरच एका 'सरजमीन' या चित्रपटात दिसणार आहे.