Jacqueline Fernandez सोबत रोमांटिक अंदाजात तो 'मिस्ट्री मॅन', फोटो व्हायरल

त्याच्यावर 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप  

Updated: Jan 9, 2022, 11:02 AM IST
Jacqueline Fernandez सोबत रोमांटिक अंदाजात तो 'मिस्ट्री मॅन', फोटो व्हायरल title=

मुंबई : झगमगत्या विश्वात कलाकार त्यांच्या कामामुळे कमी तर अन्य गोष्टींमुळे अधिक चर्चेत असतात. कधी वादग्रस्त वक्तव्य तर कधी अफेअर... यांसारख्या गोष्टी कायम चर्चेत असतात. यामध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)देखीम मागे नाही. सध्या जॅकलीनचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती एका व्यक्तीच्या फार जवळ दिसत आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीनसून महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) आहे. 

महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिन रिलेशनशिपमध्ये होती असं देखील सांगण्यात येत आहे. जॅकलिनला डिसेंबर 2020 ते ऑगस्ट 2021 दरम्यान सुकेश चंद्रशेखरकडून 10 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. ज्यावरून जोरदार वाद झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

)

जॅकलीन फर्नांडिसला हिऱ्याचे 2 कानातले, दोन ब्रेसलेट, लुईस बटनचे शूज, 9 लाख किमतीच्या चार मांजरी आणि 56 लाख किमतीचे घोडे अशा वस्तू सुकेशने भेट दिल्या असल्याचं समोर आलं.

आता या व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सुकेश चंद्रशेखरने यापूर्वी खुलासा केला होता की तो जॅकलिन फर्नांडिसला डेट करत आहे. सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.

याप्रकरणी अद्यापही तपास सुरू आहे. यामध्ये जॅकलिन आणि अभिनेत्री नोरा फतेही शिवाय अन्य प्रसिद्ध अभिनेत्रींचा देखील समावेश आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x