'रूह - अफजा' चित्रपटात जान्हवी आणि राजकुमार राव झळकणार एकत्र

अभिनेत्री जान्हवी कपूर निर्माता दिनेश विजानच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. 

Updated: Mar 29, 2019, 05:04 PM IST
'रूह - अफजा' चित्रपटात जान्हवी आणि राजकुमार राव झळकणार एकत्र

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर निर्माता दिनेश विजानच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. 'रूह - अफजा' चित्रपटात जान्हवी अभिनेता राजकुमार रावसोबत एकत्र झळकणार आहे. चित्रपटात अभिनेता वरूण शर्मा देखील भूमिका साकारणार आहे. चित्रपटात जान्हवी दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. रूही आणि अफसाना या दोन व्यक्तीरेखा जान्हवी साकारणार आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शन हर्दिक मेहता करणार आहेत. चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान आणि मृगदीप सिंबा करणार आहेत. जून महिन्यात चित्रपटाचे शुटींग उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. 20 मार्च 2020 ला चित्रपटगृपात दाखल होणार आहे. सध्या जान्हवी तिचा बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पहिल्या भारतीय आयएएफ वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. 

गुंजन सक्सेना ह्या पहिल्या भारतीय आयएएफ वैमानिक आहेत. 1999 साली झालेल्या कारगील युद्धामध्ये त्यांचे योगदान फार मोलाचे आहे. युद्ध क्षेत्रात जावून त्यांनी जखमी सैनिकांना बाहेर काढले. कोणतेही शस्त्र जवळ नसताना त्यांनी शत्रूंसोबत दोन हात केले. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना शैर्य चक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. गुंजन यांनी दिल्लीतील हंसराज महाविद्यालयातून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना आयएएफ मध्ये महिलांच्या पहिल्या वर्गात शिकण्याची संधी मिळाली.