Jawan Box Office Collection Day 5 : काही कलाकार त्यांच्या असण्यानंच एखाद्या कलाकृतीला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतात. शाहरुख खान (Shahrukh Khan) याच कलाकारांपैकी एक. गेली कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा शाहरुख त्याच्या प्रत्येक चित्रपटानंतर नवे विक्रम प्रस्थापित करतो किंवा जुने विक्रम मोडित काढतो. 'जवान'च्या प्रदर्शनानंतरही असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाच्या कमाईके आकडे झपाट्यानं वाढताना दिसले. पहिल्या चार दिवसांमध्ये शाहरुखच्या या चित्रपटानं तब्बल अडीचशे कोटी रुपयांचा गल्ला जमवसाय पण, पाचव्या दिवशी मात्र कमाईचा वेग काहीसा मंदावला. 300 कोटींच्या घरात येणार्या शाहरुखच्या या चित्रपटानं 4 विक्रमही मोडले.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार किंग खानच्या चित्रपटानं पाचव्या दिवशी 30 कोटींची कमाई केली. आठवड्याची सुरुवात आणि त्यात भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना याचा प्रभावही चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिसून आला. ज्यामुळं कमाईच्या आकड्यांत काहीशी घट झाली. सध्या हे आकडे 282.08 कोटींपर्यंत पोहोचले असून, आतापर्यंत त्यात मोठी भर पडल्याचीही शक्यत आहे.
चौथ्या दिवसाच्या कमाईनंतर किंग खानच्या चित्रपटानं चार विक्रम मोडले.
- 'जवान' पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला असून, चित्रपटानं 65.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
- दक्षिणेकडे पहिल्या तीन दिवसांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 'जवान' हा पहिला बॉलिवूडपट ठरला आहे.
- जागतिक स्तरावरील कमाईबाबत सांगावं तर, जवाननं तीन दिवसांत सर्वाधिक अर्थात 313 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- भारतात प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांमध्ये 180.45 कोटी रुपयाची कमाई करणारा 'जवान' पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम शाहरुखच्याच 'पठान'च्या नावे होता. या चित्रपटानं पहिल्या तीन दिवसांत 166.5 कोटी रुपयांची कमाई केली होती.
थोडक्यात प्रेक्षकांचा दमदार प्रतीसाद पाहता जवान आता आणखी किती कमाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल हेच खरं. दक्षिणेकडील साहसदृश्यांचा भरणा, बड्या कलाकारांची वर्णी आणि भावना, साहसी दृश्य, गूढ अशा अनेक गोष्टींना एकत्र आणून साकारण्यात आलेला हा चित्रपट तुम्ही पाहिला का?