Jawan च्या दिग्दर्शकानं चाहत्यांना दाखवली बाळाची पहिली झलक; पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचं दर्शन

Jawan Director Atlee Reveals His Baby Boy Name: 'जवान' हा शाहरूख खानचा बहुचर्चित चित्रपट 7 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या (Jawan Release Date) भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. आज या चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली यांनी आपल्या बाळाचे नाव (Atlee Baby Boy) रिव्हिल केले आहे. सध्या या फोटोला इन्टाग्रामवर प्रचंड लाईक्स मिळत आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: May 7, 2023, 09:55 PM IST
Jawan च्या दिग्दर्शकानं चाहत्यांना दाखवली बाळाची पहिली झलक; पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचं दर्शन title=
Photo: Altee | Instagram

Atlee Shares Baby Boy Photo: शाहरूख खानचा सगळ्यात बहुचर्चित चित्रपट 'जवान'  (Jawan Movie Release Date) हा यावर्षी 7 सप्टेबंरला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. तेव्हा आता प्रेक्षकांची उत्सुकता संपली असून आता हा चित्रपट काही महिन्यांच्याच प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार (Atlee Kumar Insta Post) यांनी आपल्या घरी आलेल्या नव्या पाहूण्याची झलक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

या फोटोला आत्तापर्यंत चाहत्यांनी लाईक्सचा आणि कमेंट्सचा तूफान पाऊस पाडला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. या फोटोतून अ‍ॅटली त्यांच्या पत्नी आणि बाळासह सिद्धिविनायक मंदिरात (Atlee at Siddhivinyak Mandir) आलेले दिसत आहेत. (Jawan director atlee kumar reveals his baby boy name as meer on instagram fans reacts)

शाहरूख खाननं काही दिवसांपुर्वी आपल्या 'जवान' या चित्रपटाची प्रदर्शित तारीख सोशल मीडियावरून प्रसिद्ध केली आहे. 'जवान'ची रिलिझ डेट रिविल झाल्यानंतर शाहरूखच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचसोबत आता या रिलिज डेटच्या गुडन्यूजनंतर (Atlee Shares Baby Boy Name on Instagram) या चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली यांनीही त्यापाठोपाठ आपलीही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी आपल्या लहान मुलाचे नाव 'मीर' असे ठेवले आहे. आपल्या या फोटोसह त्यांनी कॅप्शनमधून आपल्या बाळाचे नावंही जाहीर केले आहे. आजचं दुपारी त्यांनी हा फोटो शेअर केला असून या फोटोला तूफान लाईक्स आणि शुभेच्छांच्या कमेंट्स आल्या आहेत. आत्तापर्यंत 2 लाख लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. 

हेही वाचा - मर्सिडिज नाही... Shehnaaz Gill नं मध्यरात्री आईसोबत केला रिक्षातून प्रवास

दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी दिग्दर्शक म्हणून अ‍ॅटली यांना ओळखले जाते. त्यांचा बहुचर्चित 'जवान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटील येतो आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी आपल्याला पुत्ररत्न झाल्याची गुडन्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. बेडवर झोपतं एकमेकांचा हात हातात धरत त्यांनी लहान बाळाचे छोटेसे बुट दुसऱ्या हातात घेत एक हटके फोटोशूट केलं होतं. आपल्याला मुलगा झाल्याची गुडन्यूज देत त्यांनी हा फोटो शेअर केला होता; आता त्यांनी आपल्या बाळाचे (Atlee Blessed With Baby Boy) नावंही जाहीर केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2014 साली अ‍ॅटली यांनी अभिनेत्री (Krishna Priya) कृष्णा प्रियासोबत लग्न केले. 31 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या घरी एका गोंडस बाळाचे आगमन झाले होते. यावेळी त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. आपल्या स्मितहास्यातला आणि आपल्या नवजात लहानग्या बाळाचा हार्ट इमोजीनं झाकलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तामिळनाडू येथे अ‍ॅटली कुमार यांचा जन्म झाला. ते आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.