तुम्हाला लाज वाटत नाही का?; भोपाळमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी लेकासोबत पोहोचलेल्या जया बच्चन चाहत्यांवर संतापल्या

जया आणि अभिषेकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 5, 2022, 06:43 PM IST
तुम्हाला लाज वाटत नाही का?; भोपाळमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी लेकासोबत पोहोचलेल्या जया बच्चन चाहत्यांवर संतापल्या  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) आणि कॅमेरा यांच्यात असलेलं नातं हे आपल्याला चांगलच माहित आहे. जया बच्चन या पापाराझींचे अजिबात मनोरंजन करत नाही. मात्र, नुकताच व्हायरल झालेला जया यांचा काजोलसोबतचा (Jaya Bachchan With Kajol) व्हिडीओ पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते. कारण या व्हिडीओत जया बच्चन या चक्क हसताना दिसल्या. त्यानंतर जया पुन्हा एकदा स्पॉट झाल्या आहेत. ज्या व्हिडीओत त्या चाहत्यांवर चिडल्याचे दिसत आहे. 

खरंतर दशमीच्या मुहूर्तावर जया बच्चन मुलगा अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) भोपाळला गेल्या होत्या. कालीबाडी मंदिरात दर्शनासाठी त्या पोहोचल्या. जया आणि अभिषेकला येथे एकत्र पाहून लोकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच त्यांच्यासोबत सेल्फी काढू लागले. अभिषेकला सर्वांसोबत फोटो क्लिक करण्यात काहीच अडचण नव्हती, पण दुसरीकडे जया या प्रचंड चिडल्या होत्या. 

जया चाहत्यांवर चिडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्यावर ओरडत, जया त्यांना त्यांच्यापासून दूर राहण्यास सांगत आहे. यासोबतच त्या चाहत्यांना फोटो न काढण्यास सांगताना दिसत आहेत. त्या कोणाला तरी ओरडत बोलतात, काय करताय तुम्ही? आम्ही नकार देत आहोत तर थोडा विचार करा. भोपाळच्या लोकांना थोडी लाज वाटली पाहिजे.' (Jaya Bachchan Gets Angry On Fans Says Aapko Sharam Nahi Aati Hai At Bhopal) 

या सगळ्यामध्ये अभिषेकने सर्वांसोबत सेल्फी सेशन केलं. यादरम्यान काही महिलांनी त्यांच्यासोबत फोटोही काढले, तेव्हा जया त्यांच्यावरही ओरडल्या, 'अहो, तुम्ही सोडा ना. मग अनेकांनी मागून जयासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना राग येतो. त्या म्हणतात, 'काय करत आहात तुम्ही? तुम्हाला लाज वाटत नाही का?' जया बच्चन आणि अभिषेकचा हा व्हिडीओ ईटाइम्सनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नेटकऱ्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक म्हणाला, 'लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष का करत नाहीत. ते त्यांना खूप महत्त्व देतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ती नेहमी का रागावते?'