अभिषेक बच्चनला पाहून बीग बींना अश्रू अनावर; व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल

हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीवर राज्य केलं आहे.

Updated: Oct 5, 2022, 06:41 PM IST
 अभिषेक बच्चनला पाहून बीग बींना अश्रू अनावर; व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीवर राज्य केलं आहे. एवढंच नाही तर ते लोकप्रिय क्विझ आधारित रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) होस्ट करत आहेत. आजकाल ते त्यांचा 14वा सीझन होस्ट करत आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी अमिताभ बच्चन 80 वर्षांचे होतील. ते 22 वर्षांपासून केबीसीशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी स्टेजवर असं सरप्राईज ठेवलं होतं. ज्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

खरं तर, 'कौन बनेगा करोडपती'च्या निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं. केबीसीच्या मंचावर बिग बी होस्ट करण्यासाठी येताच त्यांच्यासोबत असं काही घडतं, ज्यानंतर ते रडू लागतात. सोनी टीव्हीने याचा प्रोमो व्हिडिओ इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.

बिग बींना सरप्राईज मिळालं
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बिग बी KBC 14 च्या स्टेजवर प्रवेश करतात आणि होस्टिंग सुरू करताच हॉर्न वाजतो. हे ऐकून बिग बी हादरतात. शो सुरू होण्यापूर्वीच कसा संपला याचं आश्चर्य त्यांना वाटतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यानंतर बिग बींचा ''कभी कभी मेरे दिल में ख्याल आता'' हा डायलॉग ऐकू येतो आणि मग त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्या मागून आत येतात आणि तो वडिलांना घट्ट मिठी मारतो. बिग बी देखील आनंदाने उड्या मारतात. मात्र, त्यांनी आपल्या मुलाला मिठी मारताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. हा एपिसोड 11 ऑक्टोबरला म्हणजेच बिग बींच्या 80व्या वाढदिवसाला टीव्हीवर दाखवला जाणार आहे.