जया बच्चनने मुलीसोबत धरला 'पल्लो लटके'वर ताल, व्हिडिओ व्हायरल

या पार्टीतील एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये श्वेता 'पल्लो लटके' गाण्यावर डान्स करताना दिसली. 

Updated: Apr 22, 2018, 04:46 PM IST
जया बच्चनने मुलीसोबत धरला 'पल्लो लटके'वर ताल, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी आणि पत्नी जया बच्चन नुकतेच एका पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या पार्टीतील एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये श्वेता 'पल्लो लटके' गाण्यावर डान्स करताना दिसली. काही वेळाने जया बच्चनदेखील यात सहभागी होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. सफेद रंगाच्या साडीत श्वेता सुंदर दिसतेय. गेल्यावर्षी रिलीज झालेला 'शादी मे जरूर आना' सिनेमातील 'पल्लो लटके' गाण्यावर ती ताल धरताना दिसतेय. फॅशन डिझायनर संदीप खोसलाची भाची सौदामिनी मट्टूच्या वेडिंग रिसेप्शनमधला हा डान्स आहे. या पार्टीत खूप सारे स्टार्स सहभागी झाले.

पहिल पुस्तक येतय 

 

She's got em in her genes! Super fun #shwetabachchan

A post shared by Namrata Zakaria (@namratazakaria) on

यामध्ये करण जोहरनेही डान्स केला.

 

When the director is better than any actor. @karanjohar #rockstar #fullyfilmi #talentagency #bollywood #poutorgetout

A post shared by Namrata Zakaria (@namratazakaria) on

४४ वर्षीय श्वेता अमिताभ आणि जया बच्चन यांची मोठी मुलगी आहे. तिने १९९७ मध्ये निखिल नंदासोबत लग्न केल. त्याना नव्या आणि नवेली नावाच्या दोन मुली आहे. श्वेताला आप्या आजोबा हरिवंश राय बच्चन यांच्याप्रमाणे लेखक बनायचय. तिच पहिल पुस्तक यावर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार आहे.