खरंच 'या' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जुही चावला होती प्रेग्नंट? अखेर सत्य आलं समोर

सिनेमामधील उत्कृष्ट अभिनय आणि चेहऱ्यावरील गोड स्माईल यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जुही चावला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 80 आणि 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने लाखोंची मने जिंकणारी सुंदर अभिनेत्री जुही चावला चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या वेगवेगळ्या पात्रांनी नेहमीच चर्चेत राहिली. 

Updated: Oct 6, 2023, 08:25 PM IST
खरंच 'या' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान  जुही चावला होती प्रेग्नंट? अखेर सत्य आलं समोर title=

मुंबई : सिनेमामधील उत्कृष्ट अभिनय आणि चेहऱ्यावरील गोड स्माईल यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री जुही चावला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 80 आणि 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने लाखोंची मने जिंकणारी सुंदर अभिनेत्री जुही चावला चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या वेगवेगळ्या पात्रांनी नेहमीच चर्चेत राहिली. आणि ती जितकी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत होती तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत होती. आपल्या तीन दशकांहून अधिक दीर्घ चित्रपट कारकिर्दीत तिने असे अनेक चित्रपट दिले, जे आजही लोकांना खूप आवडतात.  

जुही चावलाचा जन्म 13 नोव्हेंबर 1967 रोजी लुधियाना येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. तिने शालेय शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमधून पूर्ण केलं. यानंतर तिने सिडनहॅम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. 1994 मध्ये मिस इंडिया राहिलेल्या जुही चावलाला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी दोनदा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

'सुलतनत' चित्रपटातून पदार्पण
जुही चावलाने 1986 मध्ये आलेल्या 'सुलतानत' चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली पण हा चित्रपट फ्लॉप ठरला, त्यानंतर ती कन्नड चित्रपटांकडे वळली. तिथे नशीब आजमावल्यानंतर जुही पुन्हा बॉलीवूडकडे वळली जिथे तिला 'कयामत से कयामत तक' चित्रपटात पहिला मोठा ब्रेक मिळाला.

'कयामत से कयामत तक' मधून मिळाला मोठा ब्रेक 
हा चित्रपट हिट ठरला आणि त्यात जुहीच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला होता. जुहीने तिच्या काळात एकामागून एक अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या हिट चित्रपटांमध्ये 'इश्क', 'डर', 'कयामत से कयामत तक', 'साजन का घर' आणि 'बोल राधा बोल' या सिनेमाचा समावेश आहे.

बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केलं
जुहीने जय मेहता नावाच्या बिझनेसमनशी लग्न केलं होतं. जय यांचा व्यवसाय आफ्रिका, भारत, कॅनडा आणि अमेरिकेत पसरलेला आहे. जून 2003 मध्ये रिलीज झालेल्या सुजॉय घोषच्या 'झंकार बीट्स' चित्रपटात तिने गर्भवती गृहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटादरम्यान जुही चावला प्रेग्नंट होती.

हा चित्रपट जून 2003 मध्ये प्रदर्शित झाला, तर 21 जुलै 2003 रोजी तिने अर्जुन मेहता या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. अशा परिस्थितीत जुहीने रात्रंदिवस काम करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. जेव्हा ती पहिल्यांदा आई बनणार होती तेव्हा तिने अमेरिकेत स्टेज शो केला आणि मुलगी जान्हवीला जन्म दिला.