K.G.F Chapter 2 : केजीएफ निर्मात्याची मोठी घोषणा, चित्रपटाचे शूटिंग सुरु होण्याबाबत म्हणाले...

केजीएफ चॅप्टर १ प्रमाणेच केजीएफ चॅप्टर २ सूपरडूपर हिट ठरलाय. रिलीजच्या महिन्याभरानंतरही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. 

Updated: May 20, 2022, 06:58 PM IST
  K.G.F Chapter 2 : केजीएफ निर्मात्याची मोठी घोषणा, चित्रपटाचे शूटिंग सुरु होण्याबाबत म्हणाले... title=

मुंबई : केजीएफ चॅप्टर १ प्रमाणेच केजीएफ चॅप्टर २ सूपरडूपर हिट ठरलाय. रिलीजच्या महिन्याभरानंतरही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. आता केजीएफ चॅप्टर ३ ची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. यानिमित्त निर्माते प्रशांत नील यांचे नाव चर्चेत आले होते. याचं प्रशांत नील यांनी आता मोठी घोषणा केली आहे.  

यशचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट KGF Chapter 2 च्या निर्मात्यांनी त्यांच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केलीय. प्रोडक्शन हाऊस होंबळे फिल्म्सनेही घोषणा केली की ते नवीन कन्नड अ‍ॅक्शन फिल्म बनवणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंगही सुरु झाले आहे. या नव्या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे नाव बघीरा आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून डॉ. सुरी याचे दिग्दर्शन करत आहेत. 

दिग्दर्शक प्रशांत नील आणि प्रोडक्शन हाऊसने चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता मुहूर्ताचे फोटो शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये चित्रपटाचे स्टार आणि दिग्दर्शक सुरी मंदिरात उभे राहून पूजा करताना दिसतायत. यासोबतच चित्रपटाच्या क्लॅप बोर्डचा फोटोही शेअर करण्यात आलाय. बघीरा या चित्रपटाचे शूटिंग कर्नाटक आणि हैदराबादमध्ये होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

 KGF 3 चे शूटिंग सुरु करणार

KGF Chapter 2 रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटाची कमाई थांबण्याचे नाव घेत नाहीये. यशसोबत या चित्रपटात श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन आणि प्रकाश राज या स्टार्सनी काम केले आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाचे निर्माते विजय यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, तो ऑक्टोबर 2022 मध्ये KGF 3 चे शूटिंग सुरु करणार आहे. हा चित्रपट २०२४ पर्यंत येईल.