काजल अग्रवालच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, होणार आई?

काजल अग्रवालने गेल्या वर्षी कोरोना कालावधीत तिचा प्रियकर गौतम किचलूशी लग्न केलं

Updated: Sep 24, 2021, 05:53 PM IST
काजल अग्रवालच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, होणार आई?

मुंबई : काजल अग्रवालने गेल्या वर्षी कोरोना कालावधीत तिचा प्रियकर गौतम किचलूशी लग्न केलं. ज्याचे फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. त्याचबरोबर, आता लग्नाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. आणि एक वर्ष पूर्ण होण्याआधीच काजल अग्रवाल प्रेग्नंट असल्याचं वृत्त आहे. या बातम्यांमध्ये कितपत सत्य आहे हे आम्हाला माहीत नाही, तरी आजकाल  या बातम्यांची खूप चर्चा आहे. असंही म्हटलं जात आहे की, काजल अग्रवालच्या जागी आता जॅकलिन फर्नांडिसला एका चित्रपटात साईन करण्यात आलं आहे.

The Ghostमध्ये रिप्लेस झाली काजल अग्रवाल?
काजल अग्रवालच्या प्रेग्नंसीच्या बातम्या समोर आल्यानंतर असं म्हटलं जात आहे की, नागार्जुनच्या द घोस्ट सिनेमातील तिची जागा जॅकलीनने घेतली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी लवकरच याची घोषणा होऊ शकते. पण जेव्हापासून काजल अग्रवालच्या प्रेग्नंसीची बातमी समोर आली आहे तेव्हापासून चाहते सोशल मीडियावर खूप आनंदी दिसत आहेत.

काजल अग्रवाल इन्स्टाग्राम पोस्ट
काजल अग्रवाल आणि तिच्या कुटुंबियांनी काजलच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांबाबत काही काळ मौन पाळलं आहे. तर दुसरीकडे, जर तुम्ही काजलच इंस्टाग्राम बघितलं तर काजल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह दिसते. शुक्रवारी तिने तिचे फोटो पोस्ट केले. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, ग्लॉसऑन. त्याचवेळी, काजल अग्रवाल अलीकडेच फॅबलूक मासिकाच्या कव्हर पेजवर दिसली. ज्यात तिची स्टाईल चाहत्यांना खूप आवडली होती.