फारच कठीण प्रसंगातून जातेय म्हणत Kajol चा सोशल मीडियाला रामराम!

Kajol Takes Break from Social Media: अभिनेत्री काजोल ही कायमच कुठल्या ना कुठल्या चर्चेत राहते. परंतु त्यामुळे तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा लागून राहिलेली असते. अशातच आता काजोलनं आपल्या डिजिटल ब्रेकची घोषणा केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 9, 2023, 01:20 PM IST
फारच कठीण प्रसंगातून जातेय म्हणत Kajol चा सोशल मीडियाला रामराम! title=
June 9, 2023 | Kajol announces that she is taking break from social media as she is going with toughest trials in her life (Photo : Zee News)

Kajol Takes Break from Social Media: हल्ली सगळेच सेलिब्रेटी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते. आपले लेटेस्ट अपडेट्स ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांचे खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य हे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचत असते. सेलिब्रेटींचे थोडे थोडके नाही तर मोठ्या प्रमाणात इन्टाग्रामवर फॉलोवर्स असतात.त्यामुळे त्यांचे चाहते जसे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव टाकत असतात त्याचप्रमाणे ते चाहत्यांना ट्रोलही करत असतात. परंतु आता एका बड्या अभिनेत्रीनं मात्र सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. आपले कोट्यवधी फॉलोवर्स असता तिनं मध्येच आपल्या चाहत्यांना अपडेट न ठेवण्याचा आणि स्वत:ही अपडेट न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. 

सोशल मीडियावर काजोलनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं म्हटलं की, सध्या मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगांतून जाते आहे. त्यामुळे मी सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेते आहे. सध्या तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर अनेकांनी तिच्यासाठी प्रार्थना करणंही सुरू केले आहे. काही दिवसांपुर्वीच 'लस्ट स्टोरीज 2' चा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यात काजोलची झलक पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले होते. त्यामुळे सगळीकडे तिचीच चर्चा रंगली होती. परंतु आता तिनं पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे आणि चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. 

हेही वाचा - आरोग्यम् धनसंपदा! दूधात दालचिनी पावडर मिसळा, 'या' रोगांपासून राहाल दूर

काजोलनं शेवटचं 'सलाम वेन्की' या चित्रपटातून काम केले होते. हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. आता ती तिच्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटातून दिसणार आहे. शाहरूख खान आणि काजोलची जोडी सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे आजही त्यांची चर्चा होताना दिसते. सध्या तिची मुलगी न्यासा देवगण ही भलतीच चर्चेत आहे. आपल्या मित्रांसमवेत ती कायमच पार्टीमूडमध्ये असते. त्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडीओ कायमच चर्चेत असतात. अनेकदा ती तिच्या फॅशनमुळेही ट्रोल होते. काही दिवसांपुर्वी ती लंडनमध्ये एका प्रसिद्ध गायिकेच्या इव्हेंटला गेली होती. तेव्हा तिच्या हॉट ड्रेसमुळे ती चर्चा आली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे न्यासा आणि काजोलची. गेल्या वर्षी अजय देवगणचेही अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यांनाही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता.