सासरी काजोलला ज्या प्रसंगाचा सामना करावा लागला त्याची कल्पनाही अशक्यच

काजोलला नेमका कोणत्या प्रसंगातून जावं लागलं होतं...?  

Updated: Dec 16, 2021, 12:33 PM IST
सासरी काजोलला ज्या प्रसंगाचा सामना करावा लागला त्याची कल्पनाही अशक्यच title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री काजोल ही कायमच तिच्या दिलखुलास अंदाजासाठई ओळखली जाते. आतापर्यंत चित्रपटांमध्ये तिनं साकारलेल्या अनेक भूमिकांच्या माध्यमातूनही हीच बाब पाहायला मिळाली आहे. पण लग्नानंतर मात्र याच दिलखुलास काजोलला अशा प्रसंगातून समोर जावं लागलं होतं, ज्याची तिलाही कल्पना नव्हती. 

अभिनेता अजय देवगन, याच्याशी लग्न केल्यानंतर काजोल देवगन कुटुंबीयांची सून झाली. लग्नानंतर अनेक गोष्टींशी मेळ साधणं तिच्यासाठी कठीण होतं. ज्यासाठी स्वाभाविकच तिनं काही वेळ घेतला होता. 

संपूर्ण प्रक्रियेमध्ये काजोलला तिच्या सासरच्या कुटुंबाकडून मोठी मदत झाली. सासुबाई, वीणा देवगन या तिच्या मोठ्या आधाराच्या रुपात उभ्या होत्या. 

लग्नानंतर सासूला आंटी म्हणण्यापासून आई म्हणण्यापर्यंतचा तिचा प्रवासही सोपा नव्हता. मुळात यामध्ये तिला संकोचलेपणा वाटत होता. 

ही परिस्थिती प्रत्येक नवविवाहितेपुढे उभी राहतो. काजोलनंही त्याचाच सामना केला. 

एकदा अशी वेळ आली, ज्यावेळी काजोलच्या सासुबाईंच्या काही मैत्रीणी त्यांच्या घरी आल्या. त्यावेळी जेव्हा त्यांना कळलं की, काजोल तिच्या सासुला आई म्हणत नाही, तेव्हा त्यांनी यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. 

मैत्रिणींनी उभ्या केलेल्या या प्रश्नाचं उत्तर तिच्या सासुनंच दिलं. ती जेव्हा आई म्हणले ना तेव्हा ते तिच्या मनातून आलेलं असेल. डोक्यातून नाही.... असं वीणा देवगन त्यांच्या मैत्रिणींना म्हणाल्या. 

सासुनं आपली अशा पद्धतीनं बाजू घेतल्याचं पाहून काजोललाही मोठा दिलासा मिळाला. अनेकदा कठीण वाटणाऱ्या या नात्याची ही सहज बाजू पुढे नात्यांची समीकरणंच बदलून गेली.